कुर्डुवाडी: मुंगशी ता.माढा येथे शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरुन जन्मदात्या आईची हत्या केल्याप्रकरणी मुलगा व सुनेसह सुनेच्या पित्याचाही सहभाग असल्याचे पोलिस तपासात पुढे आले असून ताब्यात असलेल्या सुनेच्या पित्याला अखेर ५ दिवसांनी पोलिसांनी अटक दाखवून त्याला न्यायालयात हजर केले असता सुनेचा पिता धर्मराज बागल रा.ब्रह्मगाव ता.परंडा जि.धाराशिव यास दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंगशी ता.माढा येथे दि.३० रोजी रा.९.३० वा.शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून दत्तात्रय नारायण महाडिक (मुलगा),रजनी दत्तात्रय महाडिक (सून) दोघे रा.मुंगशी ता.माढा, धर्मराज बागल (सुनेचा पिता) यांनी संगनमत करुन लक्ष्मी उर्फ शोभा नारायण महाडिक वय ६२ हीची हत्या केली असल्याची फिर्याद मयताचा भाचा मारुती रामा रेवडे रा.रेवडे वस्ती अनाळा ता.परंडा जि.धाराशिव यांनी कुर्डुवाडी पोलिसांत दिली होती.
याबाबत पोलिसांनी तिघांनाही दि.३१ रोजी ताब्यात घेऊन दत्तात्रय नारायण महाडिक (मुलगा),रजनी दत्तात्रय महाडिक (सून) दोघे रा.मुंगशी ता.माढा यांना अटक केली . मुलगा व सून दोघांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना पाच दिवसाची कोठडी न्यायालयाने सुनावली होती. तिसरा आरोपी सुनेचा पिता धर्मराज बागल रा.ब्रह्मगाव ता.परंडा याचा या हत्येत सहभाग होता का याबाबत पोलिसांनी त्याला ताब्यात ठेऊन तपास केला असता अखेर ५ दिवसांनी त्याने हत्या करण्यासाठी चिथावले असल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक करुन न्यायालयापुढे उभे केले असता सुनेच्या पित्यालाही दोन दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
दारू मुलगा प्यायला म्हणून बापाने केला मुलाचा खून
दारूच्या आहारी गेलेल्या पित्याने स्वतःच्याच 35 वर्षीय मुलाचा झोपेत असताना काठीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बहादा गावात घडली आहे. महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. येथे ६५ वर्षीय वडील हिरामण धुर्वे यांनी त्यांच्या 35 वर्षीय मुलाला दिलीप धुर्वे यांची हत्या केली. असे सांगितले जात आहे की हिरामनने स्वतःसाठी दारू विकत घेतली होती पण तो ती पिऊ शकत नव्हता, कारण त्याचा मुलगा दिलीप धुर्वे तो पिण्यापूर्वीच दारू पिऊन गेला होता. अशा परिस्थितीत संतप्त वडिलांनी त्याच्या ३५ वर्षीय मुलाला लाकडी काठीने वारंवार वार करून ठार मारले. वडिलांनी मुलाला इतके मारहाण केली की त्याचा जागीच मृत्यू झाला.