Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime News: मुंबईतील आर्थर रोड जेल ‘ओव्हरफ्लो’; 50 कैद्यांच्या बराकमध्ये 200 ते 250 कैदी

न्यायाधीश एका खटल्याचा संदर्भदेत म्हणाले की, न्यायालय नियमितपणे दीर्घकाळ तुरुंगवास भोगत असलेल्या विचाराधीन कैद्यांच्या जामीन अर्जावर काम करत आहे. तुरुंगातील परिस्थितीची जाणीव आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 11, 2025 | 11:35 AM
मध्यवर्ती कारागृहात क्षमता फक्त 1800,

मध्यवर्ती कारागृहात क्षमता फक्त 1800,

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सध्या राज्यातील विविध भागांत कैद्यांसाठी जेल तयार करण्यात आली आहेत. त्यात मुंबईतील आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात मंजूर कैद्यांच्या क्षमतेपेक्षा पाच ते सहा पट जास्त कैदी आहेत. अशा पद्धतीने कैद्यांना ठेवल्याने अमानवीय परिस्थिती निर्माण होते, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. एमडी बाळगल्याच्या आरोपाखाली २०२१ मध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपीला जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने ठेवण्यासाठी मंजूर असलेल्या प्रत्येक बराकमध्ये २२०-२५० कैदी आहेत. ही परिस्थिती अमानवीय आहे, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.

हेदेखील वाचा : Sindhudurg News: “कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा…’; शिवरायांच्या पुतळा उभारणीच्या कामाबाबत काय म्हणाले नितेश राणे ?

न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने समीर लतीफ शेख याच्या जामीन अर्जावर सुनावणी केली. वकील निमेश मेहता यांच्यामार्फत युक्तिवाद करण्यात आला. २०२१ मध्ये एनसीबीने शेखवर गुन्हा दाखल केला होता.

ड्रग्जप्रकरणी आरोपीला जामीन

वकील मेहता यांनी असा युक्तिवाद केला की, शेख साडेतीन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे, या प्रकरणात चौकशी पूर्ण झाली आहे आणि आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी यांनी दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर असे निरीक्षण नोंदवले की, ड्रग्जचा हा आधुनिक काळातील एक साथीचा रोग आहे. विकसित समाजही ड्रग्ज धोक्यापासून वाचलेला नाही. ड्रग्जच्या वापराचे परिणाम दूरगामी आहेत. वाढता गुन्हेगारी दर, मंदावलेला आर्थिक विकास, आरोग्याचा दर्जा खालावणे याचा यात अंतर्भाव आहे. तरीही अर्जदार संधीस पात्र आहे हे लक्षात घेऊन, परिस्थितीचा संपूर्ण विचार करून त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात येत आहे.

कैद्यांविषयी न्यायालय काय म्हणाले?

न्यायाधीश एका खटल्याचा संदर्भदेत म्हणाले की, न्यायालय नियमितपणे दीर्घकाळ तुरुंगवास भोगत असलेल्या विचाराधीन कैद्यांच्या जामीन अर्जावर काम करत आहे. तुरुंगातील परिस्थितीची जाणीव आहे. मुंबई मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांनी म्हटले होते की, आर्थर रोड तुरुंगात मंजूर क्षमतेपेक्षा ५-६ पट जास्त कैदी आहेत. ही परिस्थिती अमानवीय आहे, परंतु हे देखील विसरता येणार नाही की ड्रग्जचे व्यसन देखील समाजासाठी एक गंभीर समस्या आहे. म्हणून जामीन अर्जावर निर्णय घेताना या दोन्ही प्राधान्यांमध्ये संतुलन राखावे लागले.

Web Title: Mumbai arthur road jail overflows prisoners increases nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 08:58 AM

Topics:  

  • Mumbai News

संबंधित बातम्या

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर
1

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने
2

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?
3

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक
4

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.