२६/११ मुंबई हल्ल्याबद्दल दहशतवादी राणाचा मोठा खुलासा; 'हो, मी पाकिस्तानी लष्कराचा एजंट होतो...' (फोटो सौजन्य-X)
Mumbai Attack Investigation : जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्यानंतर सुरक्षा एजन्सी अधिक सर्तक झाले असून कैद असलेल्या दहशतवाद्यांची कसून चौकळी केली जात आहे. यामध्ये पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी तहव्वुर हुसेन राणाची ही कसून चौकशी केली जात असून मुंबई २६/११ हल्ल्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तहव्वुर हुसेन राणा यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या चौकशीदरम्यान काही मोठे खुलासे केले आहेत.
राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) ताब्यात असलेल्या चौकशीदरम्यान राणांनी कबूल केले की, तो पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट होता, ज्याला खलीज युद्धादरम्यान सौदी अरेबियालाही पाठवण्यात आले होते. यावेळी लष्कर-ए-तोयबा ही केवळ एक दहशतवादी संघटना नाही तर ती एका हेरगिरी नेटवर्कसारखे काम करते. त्याने हे देखील कबूल केले की त्याचा मित्र आणि सहकारी डेव्हिड हेडलीने अनेक वेळा लष्करासाठी प्रशिक्षण घेतले होते.
या चौकशीदरम्यान मुंबईत त्याच्या इमिग्रेशन फर्मचे केंद्र उघडण्याची त्याची कल्पना होती आणि त्याशी संबंधित आर्थिक व्यवहार व्यावसायिक खर्च म्हणून वर्णन केले गेले होते. परंतु त्याने हे देखील कबूल केले की २००८ मध्ये २६/११ हल्ला झाला तेव्हा तो मुंबईत उपस्थित होता आणि तो पूर्णपणे दहशतवादी कटाचा भाग होता. त्याने कबूल केले की त्याने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारख्या ठिकाणांची रेकी केली होती. चौकशीदरम्यान राणाने असेही कबूल केले की हा हल्ला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयच्या सहकार्याने करण्यात आला होता. आता मुंबई पोलिस राणाला अटक करून आपल्या ताब्यात घेण्याची तयारी करत आहेत, जेणेकरून तपास पुढे नेता येईल.
तहव्वुर राणा हा २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी डेव्हिड हेडलीचा जवळचा मित्र होता. हेडलीच्या चौकशीदरम्यान राणाचा उल्लेख करण्यात आला. या हल्ल्यात १० पाकिस्तानी दहशतवादी अरबी समुद्रमार्गे मुंबईत पोहोचले आणि त्यांनी रेल्वे स्टेशन, दोन आलिशान हॉटेल्स आणि एका ज्यू केंद्रावर हल्ला केला. सुमारे ६० तास चाललेल्या या हल्ल्यात १६६ लोक मारले गेले. राणावर हेडली, लष्कर-ए-तैयबा, हरकत-उल-जिहादी इस्लामी आणि पाकिस्तानसोबत कट रचल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राणाने लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयमधील खोल संगनमत उघड केले आहे. त्याने असेही सांगितले की २००५ पासून तो पाकिस्तानस्थित कटकारस्थानांसह मुंबई हल्ल्याची योजना आखत होता. एनआयएने राणाला १८ दिवसांसाठी ताब्यात घेतले आहे आणि सखोल चौकशी सुरू केली आहे, ज्यामध्ये त्याचे आणि हेडलीमधील ईमेल, प्रवास रेकॉर्ड आणि इतर पुरावे यांचे विश्लेषण केले जात आहे. राणावर गुन्हेगारी कट, खून, दहशतवादी कृत्य आणि बनावटगिरी असे गंभीर आरोप आहेत.