Amravati News: अमरावती एमआयडीसीत थिनर फॅक्टरीत भीषण स्फोट; महिला कामगाराचा होरपळून मृत्यू
वॉर्डन आणि आयाला आला संशय आणि…
नवोदय विद्यालयात शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर हृदयाचे चिन्ह काढून त्यात मुला-मुलींची नावे लिहिल्याचा संशय अनुष्कावर वॉर्डन आणि आयाने घेतला. याच संशयावरून शाळेतील आया लता गायकवाड आणि वॉर्डन पल्लवी कणसे यांनी अनुष्काला सर्वांसमोर बेदम मारहाण केली. यामुळे अनुष्का प्रचंड मानसिक तणावाखाली गेली होती.
ती रडली नाही, फक्त शांत झाली…
मारहाण झाली त्या दिवशी अनुष्का दिवसभर कुणाशीही बोलली नव्हती आणि ती रडतही नव्हती, ती केवळ शांत आणि निराश होती. तिचा हा बदललेला स्वभाव पाहून तिच्या मैत्रिणींना काहीतरी धक्कादायक घडणार असल्याची भीती वाटली होती. त्यांनी वॉर्डन आणि आया यांना विनंती केली होती की, “आज अनुष्काची काळजी घ्या, तिला एकटे सोडू नका आणि तिला सोबत घेऊन झोपा.” मात्र, या महिला कर्मचाऱ्यांनी मुलींच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि कोणतीही खबरदारी घेतली नाही. “जर महिला कर्मचाऱ्यांनी आमचे ऐकले असते, तर आज आमची मैत्रीण जिवंत असती,” अशी काळजाला भिडणारी भावना तिच्या मैत्रिणींनी व्यक्त केली आहे. असे अनुष्काच्या मैत्रिणीने सांगितले.
वॉर्डन आणि आया अटकेत
अनुष्काज्या रूममध्ये राहत होती त्याच खोलीत वॉर्डन पल्लवी कणसे आणि आया लता गायकवाड यांचंही वास्तव्य होते. तरीही त्यांनी अनुष्काच्या मानसिक स्थितीकडे दुर्लक्ष केलं. एका विद्यार्थिनीला केवळ संशयावरून सर्वांसमोर मारहाण केला तिचा मानसिक छळ करणे हे कायद्याने गुन्हा आहे. वॉर्डनने अधिकाराचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झालं आहे. पालकांच्या तक्रारीनंतर आता या दोन्ही महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे..पोलीस आता त्यांची चौकशी करत आहे. आता काय समोर येत आणि पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे आहे.
Ans: रविवारी हॉस्टेलमध्ये अनुष्का पाटोळे हिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
Ans: शाळेतील भिंतींवरील लिखाणाच्या संशयावरून वॉर्डन व आयाने अनुष्काला सर्वांसमोर मारहाण व मानसिक छळ केल्याचे तपासात उघड झाले आहे.
Ans: पालकांच्या तक्रारीनंतर वॉर्डन पल्लवी कणसे आणि आया लता गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.






