Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी, दहशत माजवण्याचा कट! धमकी देणारा नोएडातून अटक

मुंबई पोलिसांनी शहर आणि राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. धमकीचा तपास करण्यासाठी वेगवेगळ्या कोनातून तपास केला जात आहे. आरोपीची चौकशी केली जात असून त्याच्या पार्श्वभूमीची माहिती घेतली जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 06, 2025 | 11:23 AM
Mumbai Crime: मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी, दहशत माजवण्याचा कट! धमकी देणारा नोएडातून अटक
Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी
  • धमकी देणाऱ्याला नोएडातून अटक
  • ४०० किलो आरडीएक्स वापरून मुंबई हादरवण्याची धमकी
Mumbai Crime:    मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ५ सप्टेंबर रोजी मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीची आणि मोठा स्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपी अश्विनीला आज (६ सप्टेंबर) नोएडा येथून अटक करण्यात आल्याची माहिती आहे.  शुक्रवारी (५ सप्टेेंबर) मुंबई पोलिसांना अनंत चतुर्दशीनिमित्त ३४ वाहनांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती. एका व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे पोलिसांना ही धमकी मिळाली होती, त्यानंतर पोलिस सतर्क झाले आहेत.  त्यानंतर हा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाइन नंबरवर पाठवण्यात आला होता, या मेसेजमध्ये ३४ वाहनांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले असून ४०० किलो आरडीएक्सच्या स्फोटामुळे संपूर्ण मुंबई शहर हादरेल, अशी धमकी देण्यात आली होती.

दरम्यान, आज  नोएडातून ताब्यात घेतलेल्या  आरोपीने आणखी काही खळबळजनक दावे केले आहेत. १४ लष्कर-ए-जिहादी दहशतवादी मुंबईत घुसले आहेत आणि ४०० किलो आरडीएक्स वापरून ३४ वाहने फोडण्याचा कट रचण्यात आला आहे. सध्या, आरोपीला नोएडा पोलिसांनी अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

 आपण ज्योतिषी असल्याचा आरोपाचा दावा

आरोपी अश्विनीला गुरुवारी नोएडा सेक्टर-११३ या भागातून ताब्यात घेण्यात आले.   त्याच वेळी, मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवलेल्या संदेशामुळे पोलिस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून एक मोबाईल फोन देखील जप्त केला आहे.  आरोपी सुरुवातीला स्वतःला ज्योतिषी म्हणून ओळख देण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आता त्याच्या हेतूंबद्दल सखोल चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

धमकी संदेशाची गंभीरता

आरोपीने दिलेल्ल्या धमकीनुसार,  शहरात मानवी बॉम्बसारखी ३४ वाहने उभी आहेत आणि ती मुंबईला हादरवून टाकतील.  ही सर्व वाहने लष्कर-ए-जिहादी संघटनेशी संबंधित आहेत, आणि १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात आल्याचा दावा करण्यात आला होता.  पोलिसांच्या म्हणण्यानुसार, धमकीच्या मेसेजमध्ये ४०० किलो आरडीएक्स वापरल्याचाही उल्लेख आहे. या इशाऱ्याने मुंबई पोलिसांना सतर्क केले आहे, कारण कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकते.

सुरक्षा व्यवस्था आणि पुढील कारवाई

मुंबई पोलिसांनी शहर आणि राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. धमकीचा तपास करण्यासाठी वेगवेगळ्या कोनातून तपास केला जात आहे. आरोपीची चौकशी केली जात असून त्याच्या पार्श्वभूमीची माहिती घेतली जात आहे. विशेष म्हणजे गणेश चतुर्थीच्या वेळी हा धमकी संदेश आला होता, जेव्हा मुंबईत लाखो लोक उत्सवात सहभागी होत होते. आज गणेश विसर्जनाचा दिवस आहे, त्यामुळे पोलिसांनी सुरक्षा आणखी मजबूत केली आहे.

अशी धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही 

२२ ऑगस्ट रोजी मुंबईतील गिरगाव येथील इस्कॉन मंदिराला धमकीचा ईमेल आला. इस्कॉन मंदिराच्या अधिकृत ईमेल आयडीवर धमकीचा ईमेल आला. माहितीनंतर, पोलिस आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण मंदिर परिसराची कसून तपासणी करण्यात आली. तथापि, तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळली नाही.

मुंबईतील एका हॉटेललाही बॉम्बची धमकी मिळाली

यापूर्वी, मुंबईतील एका हॉटेलला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली. मुंबईतील वरळी येथील ‘फोर सीझन्स’ हॉटेलला एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा ईमेल पाठवला होता. हॉटेल प्रशासनाने तात्काळ मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला मेलबद्दल माहिती दिली. ईमेलमध्ये तामिळनाडू पोलिसांसाठी एक संघ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. ‘फोर सीझन्स’, मुंबई (हॉटेल) च्या ३ व्हीआयपी खोल्यांचा उल्लेख करून ईमेलद्वारे ७ आयईडी आणि आयईडी स्फोटाच्या धमक्या देण्यात आल्या.

Web Title: Mumbai crime bomb blast threat to mumbai plot to create panic threatener arrested from noida

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 11:23 AM

Topics:  

  • Mumbai Police
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

Mumbai Police Action on Illegal Bangladeshi: बांगलादेशी घुसखोरांना आश्रय दिल्यास तुरुंगवास; राज्य सरकारचा कडक इशारा
1

Mumbai Police Action on Illegal Bangladeshi: बांगलादेशी घुसखोरांना आश्रय दिल्यास तुरुंगवास; राज्य सरकारचा कडक इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.