
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं काय घडलं?
२२ जुलै रोजी फेसबुकवर रचिता जोशी नावाच्या महिलेस फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये फेसबुक मेसेंजरवर संवाद सुरु झाला. या काळात दोघांनी एकमेकांशी वैयक्तिक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. यानंतर संबंधित महिलेने पैशांची मागणी केली. संशय आल्याने तक्रारदार यांनी पैसे देण्यास नकार दिला. २३ जुलैला सकाळी गौरव मल्होत्रा नावाच्या व्यक्तीने गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याचे सांगत व्हिडीओ युट्युबवर प्रसारित करण्याची धमकी दिली. व्हिडीओ हटवण्यासाठी प्रत्येक व्हिडीओमागे ४५ हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर राहुल शर्मा नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर विविध बँक खाती आणि यूपीआय आयडी पाठवून त्यावर पैसे जमा करण्यास सांगितले.
पीडित व्यक्तीने भीती पोटी १ लाख ३५ हजार रुपये ऑनलाईन व्यवहाराद्वारे आरोपींना पाठविते. पैसे दिल्यानंतरही धमक्या सुरूच राहिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित व्यक्तीने दादर पोलिसांत तक्रार दिली, तसेच राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवरही तक्रार नोंदविली. 2 या प्रकरणी जोशी, मल्होत्रा आणि शर्मा यांच्याविरुद्ध ब्लॅकमेलिंग, फसवणूक आणि ऑनलाईन खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित बँक खाती, यूपीआय व्यवहार आणि मोबाइल क्रमांकाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना
मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सतत फोनवर बोलण्याच्या संशयातून आणि कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्याच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताबयात आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घडलेली घटना ओशिवऱ्यातील गुलशननगर येथील रोस्वाल्ट बिल्डिंगमध्ये सोमवारी रात्री घडली. शबरून नेला अन्सारी (वय 25) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपी पतीचे नाव सेराज अन्सारी असे आहे.
Ans: 1 लाख 35 हजार रुपये.
Ans: अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची.
Ans: दादर पोलीस ठाणे.