
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं काय प्रकरण?
आरोपीचे नाव संजय विश्वकर्मा असून तो पीडित तरुणीच्या सतत संपर्कात होता. दोघेही व्हॉट्सअॅप आणि फोन कॉलद्वारे अनेक वेळा बोलत असत. सुरुवातीला मैत्रीपूर्ण संबंध असले तरी, काही महिन्यांनंतर संजयने तिच्यावर मानसिक दबाव आणण्यास सुरुवात केली. या अनावश्यक संपर्कामुळे आणि वर्तनामुळे तरुणीच्या पालकांनी तिला संजयपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र आरोपीचे सततचे फोन आणि संपर्क टाळता न आल्याने तरुणी त्याच्या जाळ्यात अडकत गेली.
एका दिवशी संजय विश्वकर्मा तरुणीला एका मित्राच्या कार्यक्रमासाठी घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने तिचे अनेक फोटो काढले. नंतर या फोटोंचा गैरवापर करून त्याने मॉर्फ केलेले अश्लील फोटो तयार केले. या फोटोंच्या आधारे त्याने तरुणीकडून पैशाची मागणी केली आणि सतत धमक्या दिल्या. ही माहिती मृत तरुणीच्या आईने पोलिसांना दिली. संजयने तरुणीकडून अनेकदा पैसे उकळले होते आणि पैसे दिल्यानंतरही तो तिचा छळ थांबवत नव्हता.
आठवड्यांपासून मानसिक तणाव
अशा सततच्या ब्लॅकमेलिंगमुळे तरुणी गेल्या काही आठवड्यांपासून तीव्र मानसिक ताणतणावात होती. बदनामीची भीती, कुटुंबीयांचा विचार आणि आरोपीच्या धमक्या यामुळे ती पूर्णपणे तणावात गेली. नैराश्य वाढत गेले आणि अखेर १५ नोव्हेंबर रोजी तिने राहत्या घरात छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
गुन्हा दाखल
पालकांनी तात्काळ गोरेगाव पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू करून आरोपी संजय विश्वकर्मा याला अटक केली आहे. त्याच्यावर अश्लील फोटो तयार करणे, प्रसारित करण्याची धमकी देणे, ब्लॅकमेलिंग, खंडणी मागणे आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे या गंभीर गुन्ह्यांखाली कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Ans: मॉर्फ फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या, सततचा मानसिक छळ आणि ब्लॅकमेलिंगमुळे ती मानसिक तणावात गेली होती.
Ans: कार्यक्रमात घेतलेल्या फोटोंचे अश्लील मॉर्फ तयार करून व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली.
Ans: पोलिसांनी आरोपीला अटक करून अश्लील फोटो तयार करणे, धमकावणे, खंडणी, व आत्महत्येस प्रवृत्त करणे या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला.