नेमकं काय घडलं?
डोंबिवली येथील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी ही धक्कदायक घटना घडली. पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. ज्योती आणि पोपट धाहीजे हुए दाम्पत्य मूळचे जालना येथील रहिवासी आहे. कामानिमित्य ते डोंबिवलीत वास्तव्यास होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी अशी 3 अपत्ये आहेत. बुधवारी सकाळी ज्योती आणि पोपट यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झालं. याच भांडणाच्या रागात पोपट याने ज्योतीचा गळा दाबून हत्या केली.
वाळू तस्करीवर सरकारचा मोठा घाव! पुनरावृत्ती करणाऱ्यांचे वाहन परवाने कायमस्वरूपी रद्द
शेजाऱ्यांनी याबाबत मानपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचेल. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाला सुरवात केली. आरोपी पती पोपट धाहीजे हा हत्येनंतर घटनास्थळावरून फरार झाला. मानपाडा पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, पोलीस कसून शोध घेत आहे. पोपटने ज्योतीचा खून का केला याचे कारण पोपटला अटक केल्यानंतर समोर येणार आहे. पोलीसांनी मृत ज्योती धाहीजे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
डोंबिवली सुटकेस मर्डरचा उलगडा, १२ तासात पोलिसांनी केले उघड
डोंबिवली येथे खाडी जवळ सुटकेशमध्ये एका तरुणीचा सडलेला मृतदेह आढळला होता.ही घटना पलावा उड्डाणपुलाच्या खाली देसाई खाडी जवळ सोमवारी दुपारी जवळपास 1.45 वाजता समोर आली. ही घटना समोर आल्यानंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात या महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. डायघर पोलिसांनी या प्रकरणाचा १२ तासात उलगडा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सापडलेला मृतदेह हा एका तरुणीचा आहे. या प्रकरणातील मृतक तरुणीचे नाव प्रियंका विश्वकर्मा असे आहे. तिची हत्या करणारा लिव्ह-इन पार्टनरनेच केल्याचे समोर आले आहे. हत्या करणाऱ्याचं नाव विनोद विश्वकर्मा असे आहे. मृतक प्रियंका आणि आरोपी विनोद हे दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि याच वादातून विनोदने संतापाच्या भरात प्रियांकाचा गळा दाबून तिची हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विनोदने तिचा मृतदेह एका मोठ्या सुटकेस बॅग मध्ये भरला. त्यानंतर सुटकेस देसाई खाडीजवळ आणून फेकून दिला.
Ans: पती पोपट धाहीजेने किरकोळ वादातून संतापून पत्नी ज्योतीचा गळा दाबून खून केला.
Ans: हत्या केल्यानंतर पोपट घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
Ans: दाम्पत्याला दोन मुले आणि एक मुलगी अशी तीन अपत्ये असून त्यांचे भविष्य अंधारात ढकलले गेले आहे.






