सौजन्य फोटो - AI Gemini
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०१६ मध्ये या फसवणुकीला सुरुवात झाली होती. दहिसर पूर्वेतील गायत्री सोसायटीमध्ये राहणाऱ्या परसिस मेहता यांची शेजारी मेघना इनामदार हिच्यामार्फत पनवेलमधील रमाबाई साने आणि उमेश देशपांडे यांच्याशी ओळख झाली. त्या कालावधीत परसिस यांचे पती दारा मेहता यांना तीन वेळा पक्षाघाताचा (लकवा) झटका आला होता. याच नाजूक परिस्थितीचा फायदा घेत आरोपींनी घरात वास्तुदोष आणि जादूटोणा असल्याचे भासवून पूजा करण्याच्या नावाखाली सुरुवातीला ४० ग्रॅम सोन्याची साखळी आणि ३.८५ लाख रुपये उकळले.
आरोपींनी आपल्या गुन्ह्यासाठी अनेक काल्पनिक पात्रे आणि बनावट ओळखी तयार केल्या होत्या. मुख्य आरोपी उमेश देशपांडे हा आपला आवाज बदलून स्वतःला हैदराबादमधील मठाचा १०८ वर्षांचा ‘गुरुवर्य’ असल्याचे भासवत होता. तर अश्विनी गायकवाड ही स्नेहलता दीक्षित उर्फ ‘बाईसाहेब’, आणि वृषाली गायकवाड ही रमाबाई साने असल्याचे भासवत होती. रमाबाईची हत्या झाली असून बाईसाहेब यांनी कामशेत येथे समाधी घेतल्याच्या खोट्या कहाण्याही त्यांनी दाम्पत्याला सांगितल्या.
घरात अघोरी पूजा करणे, काळी बाहुली ठेवून प्रकार करणे तसेच नेपाळमधील साधूचे भस्म आणि सिंदूर दाम्पत्याला खाण्यास दिल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांच्या संपत्तीवर डायन आणि वाईट शक्तींचा प्रभाव असून, जर या आदेशांचे पालन केले नाही तर पती आणि दोन्ही मुलांचा जीव धोक्यात येईल, अशी भीती दाखवून त्यांना मानसिक दबावाखाली ठेवले गेले.
संपत्ती शुद्ध करण्याच्या नावाखाली आरोपींनी दहिसर आणि बोरिवली येथील त्यांचे चार फ्लॅट विकण्यास भाग पाडले. या फ्लॅट विक्रीतून मिळालेले सुमारे ३.०२ कोटी रुपये आरोपींनी हडपले. याशिवाय, सुमारे १.६० कोटी रुपयांचे शेअर्स विकण्यास भाग पाडले, बँक आणि पोस्ट ऑफिसमधील ४५ लाख रुपयांची रोकड काढून घेतली आणि घरातील फर्निचरसुद्धा आपल्या ताब्यात घेतले.
मठ बांधण्याच्या नावाखाली एका साहूकाराकडून (सुदखोर) दरमहा ८ टक्के व्याजाने ४५ लाख रुपयांचे कर्ज काढण्यासही त्यांना भाग पाडले गेले. या कर्जाची परतफेड करण्यासाठी या दाम्पत्याचे तब्बल ९० लाख रुपये खर्च झाले.
जून २०२५ मध्ये आर्थिक अडचणीत सापडलेल्या या दाम्पत्याने हैदराबादला जाण्यासाठी शेजारी रवींद्र किणी यांच्याकडे २४ हजार रुपये उसने मागितले होते. दाम्पत्याची बिकट आर्थिक परिस्थिती पाहून शेजाऱ्याला संशय आला आणि त्याने चौकशी सुरू केली. तपासात समोर आले की, आरोपींनी फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून गोरेगावच्या नागरी निवारा परिषद परिसरात अनेक फ्लॅट खरेदी केले आहेत. मुख्य आरोपी उमेश देशपांडे याला दिंडोशी पोलिसांनी यापूर्वीच अन्य एका प्रकरणात अटक केली असून, दहिसर पोलीस इतर आरोपींचा व संपत्तीचा कसून शोध घेत आहेत.
Ans: मुंबईच्या दहिसर परिसरामध्ये ही घटना घडली आहे.
Ans: तंत्र-मंत्र, जादूटोणा, अघोरी पूजा आणि डायन-व्हाईट शक्तींची भीती दाखवून, तसेच चार फ्लॅट, शेअर्स आणि रोख रक्कम असे मिळून तब्बल ६.३८ कोटी रुपये उकळले.
Ans: परसिस मेहता यांच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी उमेश देशपांडेसह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.






