धावत्या टॅक्सीमध्ये कॉलेज तरुणीसमोर हस्तमैथुन (फोटो सौजन्य-X)
Mumbai Crime News Marathi: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली. मुंबईतील धावत्या शेअर टॅक्सीमध्ये कॉलेज विद्यार्थिंनीच्या बाजुला बसलेल्या एका व्यक्तीने अश्लील कृत्य केल्याचे समोर आले. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालं असून या आरोपीला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर युजर्सन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.या घटनेने महिलांच्या सुरक्षेची चिंता तर वाढलीच पण अशा घटना समाजात अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत हेही दाखवून दिलं.
ही घटना 30 नोव्हेंबर रोजी ग्रँड रोड परिसरात घडली. जेव्हा एक कॉलेज विद्यार्थी शेअर टॅक्सीने सोफिया कॉलेज (Sophia College For Women) ते ग्रँट रोड स्थानकापर्यंत प्रवास करत असताना विद्यार्थिनीला भयानक अनुभव आला. त्याच टॅक्सीत बसलेल्या एका व्यक्तीने तिच्यासमोर हस्तमैथुन सुरू केले. हे सर्व अश्लील कृत्य विद्यार्थीनीच्या मैत्रीणीने मोबाईलमध्ये शूट केलं. या घटनेनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरला आणि तो पाहिल्यानंतर लोक संतापले.
तर दुसरीकडे या घटनेनंतर कॉलेज विद्यार्थिनीवर मानसिक आघात झाला आणि तिच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम झाला. ही बाब उघडकीस आल्यानंतर 12 डिसेंबर रोजी गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हा व्हिडिओ व्हायरल आल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. 12 डिसेंबर रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 78 आणि 79 अंतर्गत गामदेवी पोलिस ठाण्यात सहप्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.गावदेवी पोलिसांनी तांत्रिक तपास पद्धती वापरून आरोपीचा माग काढला आणि त्याला अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस आता त्याने अन्य कोणत्या महिलेसमोर असा गुन्हा केला आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
We have followed you. Please share your contact details in DM.
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) December 11, 2024
याआधी विदेशी महिला नागरिकाचा कॅब ड्रायव्हरकडून अश्लील चाळे करत लैंगिक छळ घडल्याची घटना 27 नोव्हेंबरच्या रात्री घडली होती. आरोपी कॅब ड्रायव्हरने महिलेसमोर चालत्या कॅब मध्ये हस्तमैथुन केल्याचा आरोप आहे .डीएन नगर पोलिसांनी चालक योगेंद्र उपाध्याय याला अटक केली आहे.पोलिसांनी आरोपीवर भादवि कलम 354 (A) आणि 509 अंतर्गत अटक करण्यात आली.