Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन, नवकल्पना आणि स्टार्टअपमधील वाढता सहभाग महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील ‘इनोव्हेशन हब’ बनवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. स्टार्टअपची संख्या आणि त्यांच्या क्रियान्वयनाच्या बाबतीत महाराष्ट्र देशाची राजधानी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 30, 2026 | 06:22 PM
तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Follow Us
Follow Us:
  • तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल
  • स्टार्टअपची संख्या आणि क्रियान्वयनमध्ये महाराष्ट्र देशाची राजधान
  • ‘द गव्हर्नन्स चॅलेंज’ स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान
मुंबई : वित्त, उद्योग, उद्योजकता आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देशाला नेतृत्व देणारा महाराष्ट्र आता स्टार्टअपची संख्या आणि त्याच्या क्रियान्वयन या दोन्ही बाबतींत भारताची स्टार्टअप राजधानी ठरला आहे. हे सामर्थ्य आणि तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला नक्कीच भविष्यात जगाचे इनोवेशन हब बनवेल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एनसीपीए येथील जमशेद भाभा सभागृहात गेट्स फाउंडेशन आणि समग्र संस्थेच्या समन्वयाने आयोजित ‘द गव्हर्नन्स चॅलेंज’ स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीमधील विजेत्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रासह देशाच्या भावी प्रशासकीय रचनेला आकार देणाऱ्या प्रतिभा आणि कल्पना शोधण्याचा उपक्रम आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, डिजिटल प्रशासन, शहरीकरण, कृषी, आरोग्य, शिक्षण, हवामान बदल आणि नवोन्मेष परिसंस्था या क्षेत्रांमध्ये नव्या पिढीचा दृष्टिकोन प्रशासनात आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. सन २०४७ पर्यंत विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यात युवकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत ……

राज्याच्या प्रत्येक भागातील युवा संशोधकांना संधी

नागपूर, नाशिक, कोल्हापूर, नांदेड, अमरावतीसह राज्याच्या कोणत्याही भागातील युवा संशोधकांना मार्गदर्शक, तंत्रज्ञान, इन्क्युबेशन आणि बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे. वर्गखोलीतील कल्पनेपासून जागतिक कंपनीपर्यंत आणि कल्पनेपासून प्रत्यक्ष परिणाम व जागतिक विस्तारापर्यंतची संपूर्ण नवोन्मेष साखळी महाराष्ट्रात उभी करण्यात येत आहे. हॅकेथॉनचा शेवट केवळ प्रमाणपत्र देऊन न होता त्यातील कल्पनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यामध्ये महत्वाचा आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र ही देशाची स्टार्टप राजधानी

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशातील एकूण स्टार्टअपपैकी १८ टक्के स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. राज्यात ३० हजारांहून अधिक स्टार्टअप असून ही संख्या देशातील सर्वाधिक आहे. नव्या कल्पनांचे संशोधन, परीक्षण आणि अंमलबजावणी करण्यासाठी स्टार्टअप, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येणे आवश्यक आहे. राज्यातील पहिले समर्पित स्टार्टअप इन्क्युबेटर म्हणून ‘एम-हब’ विकसित करण्यात येत आहे. नवी मुंबईत ३०० एकर क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर केंद्रित ‘इनोव्हेशन सिटी’ उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२६ अंतर्गत दोन लाख युवक आणि व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून एआय आधारित संशोधनाला चालना देण्यासाठी राज्यात एआय इन्क्युबेटर्स स्थापन करण्यात येतील. शासकीय डेटा युवा नवोन्मेषकांसाठी नव्या संशोधनाचा आधार ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र स्टार्टअपचे प्रेरक स्थान

महाराष्ट्रातील ८७ विद्यापीठे, सुमारे पाच हजार ५०० महाविद्यालये आणि ४५ लाखांहून अधिक विद्यार्थी उद्याचा महाराष्ट्र घडविण्याची क्षमता बाळगतात. नव्या कल्पना घेऊन पुढे येणाऱ्या युवकांना शासन सातत्याने प्रोत्साहन देईल. २०१५ पासून मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रमाच्या सात तुकड्यांतील विविध क्षेत्रांतील युवा व्यावसायिकांना वरिष्ठ प्रशासनासोबत थेट काम करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्राने २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर आणि २०३५ पर्यंत दोन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवोन्मेष ही प्रमुख प्रेरक शक्ती ठरणार आहे. जगासाठी महाराष्ट्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती आणि संरचना करण्याचे राज्याचे ध्येय असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या चमूंनी केले सादरीकरण

द गव्हर्नन्स चॅलेंज स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहा संघांनी विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण केले. यामध्ये आयआयएम मुंबईच्या शुभम पाटील, वरुण दामले व संहिता म्हात्रे यांनी आरोग्य, जे. जे. मेहता स्कूल ऑफ बिझनेस मुंबईच्या आयुष मेहता व निलेश यांनी कृषी, इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या आरीशा बटाला, ऋतिक जैन व तरण पुरी यांनी शिक्षण, बीआयटीएस स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या श्रेष्ठा भट, तरुण शेखावत व अपूर्वा शर्मा यांनी वित्त, आयआयएम रांचीच्या हिमांशू पाटील, मजहर शेख व मोहक चंदक यांनी ‘ इन्व्हेशन इन गव्हर्नन्स ‘, तर मास्टर्स युनियन स्कूल ऑफ बिझनेसच्या अंकिता शिर्के, सिद्धार्थ राजपाल व गुरुप्रसाद शेट्टी यांनी शहरी विकास या विषयावर नवकल्पनांचे सादरीकरण केले.

हे चमू ठरले विजेते

स्पर्धेतील प्रथम पाच लक्ष रुपये रोख पारितोषिक शहर विकासावर नवकल्पनांचे सादरीकरण करणाऱ्या मास्टर्स युनियन स्कूल ऑफ बिझनेसच्या अंकिता शिर्के, सिद्धार्थ राजपाल व गुरुप्रसाद शेट्टी या चमूने मिळविले. तसेच तीन लक्ष रुपये द्वितीय रोख पारितोषिक शिक्षण विषयावर सादरीकरण करणारी स्कूल ऑफ बिझनेस ची आशीरा बाटला, तरण पुरी व ऋतिक जैन यांच्या चमूने प्राप्त केला. तसेच एक लक्ष रुपये रोख तृतीय पारितोषिक आरोग्य विषयावर नवकल्पनांचे सादरीकरण करणारे आयआयएम, मुंबईचे शुभम पाटील, वरूण दामले आणि संहिता म्हात्रे या चमूने प्राप्त केला.

Maharashtra Drought : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Web Title: Devendra fadnavis youth research maharashtra global innovation hub the governance challenge awards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
1

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
2

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
3

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह
4

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.