Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास प्रकल्पातील प्रस्तावित घरे, परिसर, उद्योगांसाठीच्या जागा आणि सामाजिक पायाभूत सुविधांचा प्रत्यक्ष व डिजिटल अनुभव देणाऱ्या ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 02, 2026 | 06:50 PM
धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू

धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू

Follow Us
Follow Us:
  • धारावीकरांना आता भविष्याचं घर प्रत्यक्ष अनुभवता येणार
  • ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य
मुंबई : ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मध्ये नागरिकांना केवळ पुनर्निर्माण प्रकल्पाचे आराखडे पाहायला मिळणार नाहीत, तर त्यांच्या भविष्यातील घराचा, परिसराचा आणि कामाच्या ठिकाणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. त्यामुळे अफवा, गैरसमज आणि अपूर्ण माहितीला आळा बसून पुनर्विकासाबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना व्यक्त केला.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसित नागरिकांना मिळणारी घरे, उद्योगांसाठीची जागा तसेच भविष्यातील सामाजिक पायाभूत सुविधांचे प्रत्यक्ष आणि डिजिटल दर्शन घडविणारे अत्याधुनिक ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटित करण्यात आले.

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

केंद्राची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही; ती एक मोठे आर्थिक इंजिन आहे. येथे कुंभारवाड्यातील मातीभांडी उद्योग, चामड्याचा व्यवसाय, अन्नप्रक्रिया, प्लास्टिक पुनर्चक्रीकरण तसेच अन्य लघु-मध्यम उद्योगांमधून मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. या उद्योगांचा सन्मान राखत त्यांना अधिक चांगली आणि नियोजित कार्यस्थळे उपलब्ध करून देण्याचा विचार पुनर्विकास आराखड्यात करण्यात आला आहे. धारावीची विद्यमान सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक ओळख जपत तिचे सर्वंकष नागरी परिवर्तन करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात होत असलेल्या नागरी परिवर्तनाचे हे आदर्श उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, धारावी पुनर्निर्माण प्रकल्प नेमका कसा असेल, आजची धारावी कशी आहे आणि भविष्यात तिचे स्वरूप कसे बदलणार आहे, याची ‘रिअल टाइम’ माहिती ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मध्ये सर्वांना मिळणार आहे. पुनर्विकासानंतर आपले काय होणार, हा धारावीकरांच्या मनातील प्रश्न आणि त्यासंबंधीचा संभ्रम दूर करण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. धारावीतील रहिवाशांना मिळणारी घरे, रस्ते, खुली मैदाने, सामाजिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी यांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे हे केंद्र नागरिक, हितधारक आणि देशभरातील नागरी नियोजनाचा अभ्यास करणाऱ्यांसाठीही उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

धारावी एक्सपिरियन्स सेंटरमध्ये आधुनिक दृश्य-श्राव्य आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून धारावीच्या वर्तमानापासून भविष्यातील स्वरूपापर्यंतचा प्रवास उलगडण्यात आला आहे. या संपूर्ण केंद्राची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी प्रख्यात गायक शंकर महादेवन यांनी गायिलेल्या, बदलत्या धारावीचे चित्र मांडणाऱ्या ‘धारावी का कल’ या विशेष गीताचे लाँचिंग आणि ‘मेरे सपनों की धारावी’ या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलचा पोलादपूरमध्ये मृत्यू

Web Title: Dharavi experience centre inaugurated devendra fadnavis says citizens can see future homes and workspaces sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • dharavi
  • Mumbai

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत
1

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत

Mira Bhayandar News: वाहने खरेदी केली, वापर विसरले? मिरा-भाईंदर महापालिकेचा अजब कारभार; घोडबंदर डेपोत घंटागाड्यांची दुरवस्था
2

Mira Bhayandar News: वाहने खरेदी केली, वापर विसरले? मिरा-भाईंदर महापालिकेचा अजब कारभार; घोडबंदर डेपोत घंटागाड्यांची दुरवस्था

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
4

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.