: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; सीबीआय चौकशीचे आदेश!
दिशाच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी, १४ जून २०२० रोजी, सुशांत सिंह राजपूतचाही मृतदेह आढळला. दिशाचे वडील, सतीश सालियन यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूची नव्याने चौकशी आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप आहेय दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत दिशाचा मृत्यू आत्महत्या असल्याचे म्हटले आहे आणि त्यांच्या तपासात कोणताही घातपात किंवा लैंगिक अत्याचाराचा पुरावा आढळला नसल्याचे सांगितले आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूची नव्याने आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
२०२३ मध्ये, मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. १४ व्या
यासोबतच घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि पंचनामा यावरही न्यायालयाने आक्षेप नोंदवला. मृत्यूच्या परिस्थितीबद्दल कुटुंबीयांनी शंका व्यक्त करूनही एफआयआर का दाखल केला नाही, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात अपघाती मृत्यू अहवाल (ADR) दाखल केला होता, परंतु नंतरच्या तपासात ही आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले.
सुनावणीदरम्यान, न्यायालयाने शवविच्छेदन प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिशाचे शवविच्छेदन एकाच डॉक्टरने केले होते, तर राज्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशा प्रकरणांमध्ये दोन डॉक्टर असणे आवश्यक आहे, अशी माहिती देण्यात आली. अहवालात डोके, हात, पाय आणि छातीला झालेल्या जखमांचा उल्लेख होता आणि डोक्याला झालेली दुखापत हे मृत्यूचे कारण असल्याचे नमूद केले होते. पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालात लैंगिक अत्याचार किंवा बलात्काराचा कोणताही पुरावा आढळला नाही. साक्षीदारांचे जबाब आणि तपासाच्या आधारे, दिशाने स्वतःच इमारतीवरून उडी मारली असल्याचा दावाही पोलिसांनी केला होता.






