Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चक्क Siddhivinayak मंदिरात चोरी! दानपेटीतून चोरले तब्बल ‘इतके’ रुपये; पोलिसांकडून तपास सुरु

प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात चोरीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंदिरातीलच एका कर्मचाऱ्याने दानपेटीतून पैसे चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. पण नेमकं काय घडलं?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 22, 2026 | 06:11 PM
(फोटो सौजन्य: Gemimi)

(फोटो सौजन्य: Gemimi)

Follow Us
Follow Us:
  • सिद्धिविनायक गणपती मंदिरात चोरीचा धक्कादायक प्रकार
  • सीसीटीव्हीने उघड केला काळा कारनामा
  • चोरीचा आकडा वाढण्याची शक्यता
Mumbai Siddhivinayak Temple Money Stolen : कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईच्या प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात चोरीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंदिरातीलच एका कर्मचाऱ्याने दानपेटीतून पैसे चोरल्याचे समोर आले असून, दादर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पण नेमकं काय घडलं?

Ashok Kharat Case : अरे हा माणूस आहे की शैतान! नवऱ्याला खोलीबाहेर ठेवून भोंदू बाबा खरातचा गरोदरबाईवर अत्याचार, गुन्हा दाखल

नेमकी घटना काय?

राजेंद्र पेंडुरकर (वय ५७, रा. लोअर परळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही चोरीची घटना शुक्रवारी उघडकीस आली. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असताना, पेंडुरकर हे दानपेटीतून अत्यंत चलाखीने पैसे काढताना दिसले. हा प्रकार लक्षात येताच मंदिर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.

सीसीटीव्हीने उघड केला काळा कारनामा

धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने ही चोरी एकदाच केली नव्हती. मंदिर ट्रस्टने मागील ८ ते १० दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी वारंवार दानपेटीवर डल्ला मारत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर ट्रस्टने तातडीने दादर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून आरोपीला ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

चोरीचा आकडा वाढण्याची शक्यता

प्राथमिक चौकशीत आरोपीने सुमारे १०,००० रुपये चोरल्याची कबुली दिली आहे. मात्र, सीसीटीव्हीमधील पुरावे पाहता त्याने गेल्या अनेक दिवसांपासून अशा प्रकारे पैसे चोरले असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे चोरी झालेली एकूण रक्कम मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, या गुन्ह्यात मंदिरातील आणखी काही कर्मचारी सहभागी आहेत का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?

सिद्धिविनायक मंदिर हे केवळ मुंबईतीलच नव्हे, तर देशातील सर्वात श्रीमंत आणि सुरक्षित मंदिरांपैकी एक मानले जाते. येथे दररोज हजारो भाविकांसह राजकीय नेते, चित्रपट कलाकार आणि खेळाडू दर्शनासाठी येत असतात. नुकतेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही येथे दर्शन घेतले होते. अशा उच्च सुरक्षा असलेल्या ठिकाणी मंदिराच्याच कर्मचाऱ्याने चोरी केल्यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट आहे. सध्या दादर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, मंदिर प्रशासनानेही अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्याचं ठरवलं आहे.

सावंतवाडीत ‘ओटी’ भरण्याच्या बहाण्याने लूट; संशयास्पद महिला अन् डिलिव्हरी बॉईजवर कारवाई करण्याची मागणी

Web Title: Mumbai siddhivinayak temple money stolen from donationa box employee arrested plice investigating marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • CCTV
  • crime news
  • Siddhivinayak Temple

संबंधित बातम्या

वडगाव पोलिसांची बेकायदा धंद्यांवर धडक कारवाई; टाकवे बुद्रुक येथे गांजासह प्रतिबंधित पानमसाला जप्त
1

वडगाव पोलिसांची बेकायदा धंद्यांवर धडक कारवाई; टाकवे बुद्रुक येथे गांजासह प्रतिबंधित पानमसाला जप्त

तू शहर सोडून जा, नाहीतर तुला…; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग
2

तू शहर सोडून जा, नाहीतर तुला…; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग

तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या
3

तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या

Bihar : सतत रडत होते बाळ, आवाज सहन न झाल्याने आईनेच कोयत्याने चिरला ६ महिन्यांच्या मुलीचा गळा; घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न
4

Bihar : सतत रडत होते बाळ, आवाज सहन न झाल्याने आईनेच कोयत्याने चिरला ६ महिन्यांच्या मुलीचा गळा; घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.