Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

शेटफळमध्ये किरकोळ वादाला जातीय तणावाची किनार मिळाल्यानंतर दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. जवानावर प्राणघातक हल्ल्यापासून घरांवर झालेल्या हल्ल्यापर्यंतच्या घटनांमुळे गावात तणाव निर्माण झाला असून, दोन्ही बाजूंनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 25, 2026 | 04:36 PM
Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Follow Us
Follow Us:
  • जवानासह दोन्ही गटांतील अनेक जण गंभीर जखमी
  • घरांवर हल्ला, तोडफोड; अ‍ॅट्रॉसिटी आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
  • गावात कडक पोलीस बंदोबस्त; प्रशासनाकडून शांततेचे आवाहन
 

मोहोळ : तालुक्यातील शेटफळ गावात पूर्ववैमनस्य, धार्मिक प्रथा आणि शेळ्या शेतात गेल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या संघर्षात भारतीय सैन्यातील एका जवानासह दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जवानावर सत्तूरने हल्ला

२३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास राजमाता दूध संकलन केंद्रासमोर पहिली घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शेळ्या चरण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर भारतीय सैन्यातील जवान सुमित उत्तरेश्वर खडके आणि त्यांचे चुलत भाऊ राम वसंत खडके दूध संकलन केंद्रावर गेले होते. यावेळी काही जणांनी त्यांना घेरून मारहाण केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, सुमित खडके यांच्या डोक्यावर सत्तूरने वार करण्यात आला. राम खडके यांनाही मारहाण झाली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या व्यक्तींवरही हवेच्या पंपाने हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा: Crime News: ‘DDR ची प्रत द्या’ म्हणत पोलीस ठाण्यात आला अन् अचानक विष प्यायलं; नेमकं काय घडलं?

रोकड आणि सोन्याची साखळी हिसकावल्याचा आरोप

हाणामारीदरम्यान राम खडके यांच्या खिशातील ११ हजार रुपये तसेच सुरज खडके यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची साखळी जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत तक्रार दिल्यास अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी राम खडके यांच्या तक्रारीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या दिवशी जमावाचा घरांवर हल्ला

दरम्यान, ऑगस्ट महिन्यातील श्रावण सोमवारी सिद्धेश्वर मंदिरातील पादुकांना हार घालण्यावरून वाद झाल्याची पार्श्वभूमी असल्याचे सांगण्यात येते. याच पूर्ववैमनस्यातून २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास परिस्थिती पुन्हा चिघळली. भीमनगर परिसरात १०० हून अधिक लोकांचा जमाव जमल्याचा आरोप आहे. पोलिस बंदोबस्त असतानाही जमावाने अरविंद सिद्धेश्वर थोरात यांच्या घरात प्रवेश करून लोखंडी पाइप आणि काठ्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

हेही वाचा:Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य

अ‍ॅट्रॉसिटीसह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

अरविंद थोरात यांच्या डोक्यावर लोखंडी पाइपने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याशिवाय परिसरातील इतर घरांमध्येही तोडफोड आणि मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ३६ नामनिर्देशित व्यक्ती आणि १०० हून अधिक अनोळखी व्यक्तींविरोधात खुनाचा प्रयत्न, दंगल आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावात तणावपूर्ण शांतता

घटनेनंतर प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांनी शेटफळमध्ये भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रांताधिकारी सचिन इथापे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप, सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे आणि पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप करत आहेत.

Web Title: Shetphal caste tension fight police case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Attack
  • crime news
  • India army

संबंधित बातम्या

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
1

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी
3

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक
4

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.