Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

चार दिवसांत त्याच्याविरुद्ध दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. निशांत यांचे मेयो रुग्णालयासमोर कांचन मेडिकल स्टोअर आहे. २०२२ मध्ये त्यांची रितेश बोरकरशी ओळख झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 26, 2026 | 07:57 AM
गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Follow Us
Follow Us:

नागपूर : वृत्तवाहिनीमध्ये भागीदार करून गुंतवणुकीवर भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत मेडिकल व्यावसायिकाची तब्बल 20 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुंतवलेली रक्कम परत मागितल्यानंतर कार्यालयात बोलावून मारहाण केली. एवढेच नव्हे तर पिस्तूल दाखवून खिशातील ५० हजार रुपये हिसकावले आणि ठार मारण्याची धमकीही दिली.

याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी निशांत प्रमोद गुप्ता (वय ४३, रा. दोसर भवन चौक) यांच्या तक्रारीवरून ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कथित आरोपींमध्ये रितेश बोरकर, प्रमोद भागचंदानी, विजय खवसे, रिंकू पानतवणे, उमेश यादव, सुजीत भोयर आणि सुनील मांगलकर यांचा समावेश आहे. या प्रकरणामुळे प्रमोद भागचंदानी पुन्हा चर्चेत आला आहे. चार दिवसांत त्याच्याविरुद्ध दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. निशांत यांचे मेयो रुग्णालयासमोर कांचन मेडिकल स्टोअर आहे. २०२२ मध्ये त्यांची रितेश बोरकरशी ओळख झाली.

Crime News : मोबाईलमधील डिलीट डेटा ठरला महत्त्वाचा; तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा

रितेशने स्वतःला ‘महा न्यूज ७’ या वृत्तवाहिनीचा संचालक असल्याचे सांगितले. वृत्तवाहिनीचा विस्तार करण्यासाठी गुंतवणूकदारांची आवश्यकता आहे. गुंतवणुकीच्या बदल्यात चांगला नफा मिळेल, असे सांगून त्याने निशांत यांना गुंतवणुकीसाठी तयार केल्याचा आरोप आहे. निशांत यांनी वेगवेगळ्या वेळी रोख, ऑनलाईन आणि आरटीजीएसद्वारे सुमारे २० लाख रुपये दिले. त्याशिवाय परिचित अनिल पटेल यांच्याकडून दोन लाख रुपये घेऊन तेही रितेशला दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पार्टनरशिप डीड करतो म्हणाला अन्…

भागीदारी करार तयार करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. तसेच सुरक्षेच्या नावाखाली एचडीएफसी बँकेचा स्वाक्षरी केलेला कोरा धनादेशही घेतल्याचा आरोप आहे.

कार्यालयात बोलावून केली मारहाण

भागीदारी करार तयार करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे दोघांमधील वाद वाढला. पुढे तडजोडीनुसार काही साहित्य परत करण्याचे ठरल्याचे तक्रारीत नमूद आहे. १५ मे २०२५ रोजी रितेशने निशांत यांना वृत्तवाहिनीच्या कार्यालयात बोलावले. तेथे रितेशसह उमेश यादव, सुजीत भोयर, सुनील मांगलकर, रिंकू पानतवणे, प्रमोद भागचंदानी आणि विजय खवसे उपस्थित होते. तेथे आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली. याचवेळी प्रमोद भागचंदानीने पिस्तूल दाखवून धमकावले आणि निशांत यांच्या खिशातील ५० हजार रुपये काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Businessman cheated with the promise of good returns on investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 07:57 AM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
1

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
2

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
3

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.