
crime news
Husband Murder Case: कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील हुनसूर परिसरातून एक अत्यंत थरारक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने अतिशय क्रूरपणे संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीचा कट रचून खून करणारी आरोपी महिला पवित्रा आणि तिचा प्रियकर सुनील या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पवित्राचे लग्न रामप्रसाद यांच्यासोबत झाले होते आणि या जोडप्यास दोन मुलेही आहेत. सुखी संसार सुरू असतानाच गावातील सुनील नावाच्या तरुणासोबत पवित्राचे सूत जुळले. या अनैतिक संबंधांची माहिती रामप्रसाद यांना मिळाल्यानंतर पती-पत्नीमध्ये रोज वादाचे प्रसंग घडत होते. दररोजच्या भांडणाला कंटाळून आणि प्रियकरासोबत राहण्याच्या हव्यासापोटी पवित्राने पतीचा काटा काढण्याचा भयंकर कट रचला.
पतीला संपवण्यासाठी पवित्राने सोशल मीडिया आणि युट्यूबचा सहारा घेतला. युट्यूबवरून तिने धोतऱ्याच्या विषारी बिया कशा वापरायच्या आणि त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो, याची माहिती गोळा केली. १६ ऑक्टोबरच्या रात्री रामप्रसाद दारू पिऊन घरी आला. हीच संधी साधून पवित्राने ठरवल्याप्रमाणे इडली बनवून त्यात धोतऱ्याच्या बियांची पावडर मिसळली आणि नवऱ्याला खायला दिली. मात्र, तिच्या कल्पनेप्रमाणे विषाचा तात्काळ परिणाम झाला नाही आणि रामप्रसाद इडली खाऊनही जिवंत राहिला.
विषाचा प्रयोग अपयशी ठरल्याने घाबरलेल्या पवित्राने तातडीने प्रियकर सुनीलला घरी बोलावून घेतले. त्यानंतर रात्रीच्या अंधारात दोघांनी मिळून रामप्रसाद यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा गळा आवळून जागीच जीव घेतला.
हत्या केल्यानंतर कोणताही संशय येऊ नये म्हणून पवित्राने बनाव रचला. तिने रामप्रसाद यांच्या भावाला फोन करून, “दही खाल्ल्यापासून ते उठतच नाहीत,” असे खोटे सांगितले. कुटुंबीयांनी घाबरून त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरुवातीला हृदयविकार किंवा आजारपणाने मृत्यू झाल्याचे मानून अंत्यसंस्कारही उरकण्यात आले. मात्र, पोलिसांना गुप्त माहिती आणि संशयास्पद हालचालींवरून शंका आल्याने त्यांनी कसून तपास सुरू केला. तपासादरम्यान सर्व थरारक घटनाक्रम आणि कॉल डिटेल्स समोर आले. अखेर पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच पवित्रा आणि प्रियकर सुनील यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
Ans: ही घटना कर्नाटक राज्यातील म्हैसूर जिल्ह्यातील हुनसूर येथे घडली.
Ans: पत्नीने युट्यूबवरून धोतऱ्याच्या विषारी बियांचा वापर कसा करायचा हे शिकून इडलीमध्ये धोतऱ्याच्या बियांची पावडर मिसळली होती.
Ans: आरोपी पत्नीचे नाव पवित्रा आणि तिच्या प्रियकराचे नाव सुनील असे आहे.