Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दानोळीतील महेश दळवी खून प्रकरणाचा उलगडा, चार संशयितांना अटक; आठ दिवसांची पोलीस कोठडी

जयसिंगपूर  शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील चांदोली वसाहतीत महेश बजरंग दळवी (वय ४१) यांचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी चौघा संशयित आरोपींना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 25, 2026 | 03:00 PM
दानोळीतील महेश दळवी खून प्रकरणाचा उलगडा, चार संशयितांना अटक; आठ दिवसांची पोलीस कोठडी

दानोळीतील महेश दळवी खून प्रकरणाचा उलगडा, चार संशयितांना अटक; आठ दिवसांची पोलीस कोठडी

Follow Us
Follow Us:
  • महेश दळवी खून प्रकरणात चार संशयितांना अटक
  • हातकणंगले परिसरात पोलिसांनी आरोपींना पकडले
  • चौघांना आठ दिवसांची पोलीस कोठडी
जयसिंगपूर :  शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील चांदोली वसाहतीत महेश बजरंग दळवी (वय ४१) यांचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी चौघा संशयित आरोपींना अटक केली आहे. हातकणंगले परिसरात हे संशयित असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आहे. शनिवारी (दि. २४) न्यायालयात हजर केले असता चौघांनाही आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

महेश दळवी यांचा १९ ऑक्टोबर रोजी दानोळी येथील चांदोली वसाहतीत शिवप्रेमी चौक ते सह्याद्री चौक मार्गावरील धोंडीराम गुरव यांच्या घरासमोर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून महेश दळवी यांच्यावर गोळीबार करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे रोहित भुपाल मगदूम (वय २६, रा. उमळवाड) संतोष भिमराव कोळी (वय २७, रा. चांदोली वसाहत, दानोळी) अनमोल सुनील करे (वय ३३, रा. कोथळी) आणि अश्विनकुमार ऊर्फ ऋषिकेश राजेंद्र भोई (वय २९, रा. सांगलीवाडी, सांगली) अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

हे सुद्धा वाचा : अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, कोठडीत दुखापत अन् मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ

संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त

याप्रकरणी त्यांचे भाऊ विजय बजरंग दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती. तपासादरम्यान जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना गोपनीय बातमीदारामार्फत संशयित आरोपी हातकणंगले परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ठाकूर व त्यांच्या पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा : मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल आणून संभाजीनगरमध्ये विक्री, सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल…

💡

Frequently Asked Questions

  • Que: महेश दळवी यांचा खून कधी आणि कुठे झाला?

    Ans: शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील चांदोली वसाहतीत १९ ऑक्टोबर रोजी महेश बजरंग दळवी (वय ४१) यांच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला. मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला होता.

  • Que: महेश दळवी खून प्रकरणात किती संशयितांना अटक झाली?

    Ans: जयसिंगपूर पोलिसांनी रोहित मगदूम, संतोष कोळी, अनमोल करे आणि अश्विनकुमार ऊर्फ ऋषिकेश भोई या चार संशयितांना अटक केली आहे. ते हातकणंगले परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

  • Que: न्यायालयाने किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावली?

    Ans: शनिवारी (२४ ऑक्टोबर) न्यायालयात हजर केले असता चारही संशयितांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्राथमिक चौकशीत संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: The police have arrested four individuals in connection with the mahesh dalvi murder case nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, कोठडीत दुखापत अन् मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ
1

अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, कोठडीत दुखापत अन् मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ

Spa Nagpur Raid: स्पाच्या आड काळाधंदा! पॉश अचरज टॉवरवर धाड; ३ महिलांची सुटका, संचालिका फरार
2

Spa Nagpur Raid: स्पाच्या आड काळाधंदा! पॉश अचरज टॉवरवर धाड; ३ महिलांची सुटका, संचालिका फरार

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल आणून संभाजीनगरमध्ये विक्री, सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल…
3

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल आणून संभाजीनगरमध्ये विक्री, सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल…

Kalyan News: खाकी वर्दीचा गैरवापर? मज्जाव केल्याचा राग धरत पोलिसांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप!
4

Kalyan News: खाकी वर्दीचा गैरवापर? मज्जाव केल्याचा राग धरत पोलिसांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.