Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hingoli Crime News: हिंगोलीत रक्ताचे नाते ठरले वैरी! पाण्याच्या वादातून पुतण्याने केली काका-काकूची निर्घृण हत्या

Hingoli Crime News: हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील वडद गावातून एक अत्यंत सुन्न करणारी बातमी समोर आली आहे! सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून पुतण्याने आपल्याच काका-काकूवर चाकूने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. घटनेनंतर गावात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 25, 2026 | 05:13 PM
crime news

crime news

Follow Us
Follow Us:
  •  विहिरीच्या पाण्याच्या वादातून पुतण्याने काका-काकूची चाकूने भोसकून केली हत्या
  • आरोपी देवेंद्र चोपडेच्या हल्ल्यात त्र्यंबक व मंगलाबाई चोपडे यांचा जागीच मृत्यू
  • औंढा नागनाथ पोलिसांनी आरोपी पुतण्याला तात्काळ घेतले ताब्यात
Hingoli Crime News: हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तालुक्यातील वडद येथे शेतीच्या आणि सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून पुतण्याने आपल्याच सख्ख्या काका आणि काकूची धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण औंढा नागनाथ तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Beed Crime News: ‘त्या’ चिठ्ठीने उघड केले हॉटेल मालकांचे काळे कारनामे! बीडमध्ये मॅनेजरच्या आत्महत्येने खळबळ

विहिरीच्या पाणी वाटपावरून उफाळला वाद

मिळालेल्या माहितीनुसार, वडद येथील चोपडे कुटुंबात शेतातील सामाईक विहिरीच्या पाणी वाटपावरून आणि शेतीची मालकी कोणाकडे असावी, यावरून गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र वाद सुरू होता. याच वादातून रविवारी सकाळी दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे रूपांतर काही वेळातच भीषण हाणामारीत झाले.

धारदार चाकूने सपासप वार; दोघेही जागीच ठार

वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या आरोपी पुतण्या देवेंद्र चोपडे याने घरातील धारदार चाकू आणून काका त्र्यंबक चोपडे आणि काकू मंगलाबाई चोपडे यांच्यावर प्राणघातक वार केले. अत्यंत गंभीर जखमी झाल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काका-काकूंचा जागीच वेदनादायक मृत्यू झाला.

हेही वाचा: Crime And Judicial News: मोठा राजकीय-न्यायालयीन भूकंप! ३६ जणांना फाशी देणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली

आरोपी पोलिसांच्या ताब्यात, परिसरात भीतीचे सावट

घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी (Post-mortem) ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिसांनी तत्परता दाखवत संशयित आरोपी देवेंद्र चोपडे याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भीषण दुहेरी हत्याकांडामुळे वडद गावासह संपूर्ण परिसरात भीतीचे आणि शोककुळ वातावरण पसरले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही दुहेरी हत्याकांडाची घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथे घडली.

  • Que: हत्येमागील मुख्य कारण काय होते?

    Ans: शेतातील सामाईक विहिरीच्या पाणी वाटपावरून आणि शेतीच्या मालकीवरून चोपडे कुटुंबात सुरू असलेला वाद हे हत्येचे मुख्य कारण होते.

  • Que: मृत आणि आरोपींची नावे काय आहेत?

    Ans: त्र्यंबक चोपडे व मंगलाबाई चोपडे असे मृत काका-काकूंचे नाव असून, देवेंद्र चोपडे असे आरोपी पुतण्याचे नाव आहे.

Web Title: Hingoli aundha nagnath double murder vadad land dispute crime sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • crime news
  • Hingoli Crime
  • Hingoli News

संबंधित बातम्या

जमिनीचा वाद अन् हत्येची सुपारी! व्यावसायिकावर कटरने हल्ला; पुण्यातील घटनेनं खळबळ
1

जमिनीचा वाद अन् हत्येची सुपारी! व्यावसायिकावर कटरने हल्ला; पुण्यातील घटनेनं खळबळ

दानोळीतील महेश दळवी खून प्रकरणाचा उलगडा, चार संशयितांना अटक; आठ दिवसांची पोलीस कोठडी
2

दानोळीतील महेश दळवी खून प्रकरणाचा उलगडा, चार संशयितांना अटक; आठ दिवसांची पोलीस कोठडी

अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, कोठडीत दुखापत अन् मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ
3

अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, कोठडीत दुखापत अन् मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ

हिंगोलीत हिवाळ्यातच पाणीटंचाईची चाहूल; भूजल पातळीत 2.23 मीटरने झाली घट
4

हिंगोलीत हिवाळ्यातच पाणीटंचाईची चाहूल; भूजल पातळीत 2.23 मीटरने झाली घट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.