Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जमिनीचा वाद अन् हत्येची सुपारी! व्यावसायिकावर कटरने हल्ला; पुण्यातील घटनेनं खळबळ

राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जमिनीच्या वादातून व्यावसायिकाचा खून करण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 25, 2026 | 04:37 PM
जमिनीचा वाद अन् हत्येची सुपारी! व्यावसायिकावर कटरने हल्ला; पुण्यातील घटनेनं खळबळ

जमिनीचा वाद अन् हत्येची सुपारी! व्यावसायिकावर कटरने हल्ला; पुण्यातील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • व्यावसायिकाच्या हत्येसाठी ५० हजारांची सुपारी 
  • कटरने हल्ला केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
  • मुख्य आरोपी प्रवीण सूर्यवंशीचा शोध सुरू
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जमिनीच्या वादातून व्यावसायिकाचा खून करण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात सहकार आयुक्त कार्यालयातील सुनावणी संपवून वकिलासोबत जाताना संबंधित व्यावसायिकावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धारदार कटरने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून, त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

 

आनंद बाबा गव्हाणे (वय १९, रा. गुलटेकडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, या हल्ल्यात व्यवसायिक जीवन रंगराव सूर्यवंशी (वय ५५, रा. धाराशिव) हे जखमी झाले आहेत. बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे निरीक्षक विनोद सलगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल पवार, प्रकाश आव्हाड, सारस साळवी, निलेश पालवे, ज्ञाना बडे, महेश जाधव, मनोज भोकरे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

तीन दिवसांपुर्वी (दि. २२ सप्टेंबर) सहकार आयुक्त कार्यालयातील सुनावणी संपवून सुर्यवंशी हे वकिलासोबत ससून रुग्णालयाच्या दिशेने जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर धारदार कटरने चेहर्‍यावर वार केले. या हल्ल्यात सूर्यवंशी गंभीर जखमी झाले. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढून गव्हाणे आणि साथीदाराला ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी मुख्य आरोपी प्रवीण बाळाजी सूर्यवंशी (रा. बाभूळगाव, ता. उमरगा) याचे नाव सांगितले.

हे सुद्धा वाचा : पहाटे तरुणांची गाडी अडवली, चाकूचा धाक दाखवून हात-पाय बांधलेअन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

मुख्य आरोपी प्रवीण यांचे तक्रारदार यांच्यासोबत जमिनीवरून वाद सुरू होते. या वादातून प्रवीणने त्यांच्या खून करण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचे आरोपींनी सांगितले. त्यानुसार त्यांनी हल्ला केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. हल्ल्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून, वार करण्यासाठी वापरलेला कटर मुख्य आरोपीने पुरविल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : ऊसदराची कोंडी कोण फोडणार? पहिली उचल किती मिळणार? कारखानदारांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यात व्यावसायिकावर हल्ला का करण्यात आला?

    Ans: जमिनीच्या वादातून व्यावसायिक जीवन सूर्यवंशी यांची हत्या करण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

  • Que: या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी किती जणांवर कारवाई केली?

    Ans: बंडगार्डन पोलिसांनी आनंद बाबा गव्हाणे या १९ वर्षीय तरुणाला अटक केली असून, त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

  • Que: व्यावसायिकावर हल्ला कुठे आणि कसा करण्यात आला?

    Ans: सहकार आयुक्त कार्यालयातील सुनावणी संपवून वकिलासोबत जात असताना ससून रुग्णालयाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जीवन सूर्यवंशी यांच्यावर धारदार कटरने वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.

Web Title: An incident has occurred in pune in which a businessman was attacked nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • pune news

संबंधित बातम्या

महापौर निवासस्थानी तिरंगा अन् भगवा ध्वज कायमस्वरूपी लावा; नगरसेवक सुनील पांडे यांची मागणी
1

महापौर निवासस्थानी तिरंगा अन् भगवा ध्वज कायमस्वरूपी लावा; नगरसेवक सुनील पांडे यांची मागणी

दानोळीतील महेश दळवी खून प्रकरणाचा उलगडा, चार संशयितांना अटक; आठ दिवसांची पोलीस कोठडी
2

दानोळीतील महेश दळवी खून प्रकरणाचा उलगडा, चार संशयितांना अटक; आठ दिवसांची पोलीस कोठडी

अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, कोठडीत दुखापत अन् मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ
3

अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, कोठडीत दुखापत अन् मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ

Spa Nagpur Raid: स्पाच्या आड काळाधंदा! पॉश अचरज टॉवरवर धाड; ३ महिलांची सुटका, संचालिका फरार
4

Spa Nagpur Raid: स्पाच्या आड काळाधंदा! पॉश अचरज टॉवरवर धाड; ३ महिलांची सुटका, संचालिका फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.