Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकमेकांकडे पाहिल्याचा राग अन् थेट डोक्यावर वार; पुण्यात अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी

एकमेकांकडे पाहण्याच्या क्षुल्लक वादातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना उत्तमनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघांना अटक केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 26, 2026 | 12:30 AM
एकमेकांकडे पाहिल्याचा राग अन् थेट डोक्यावर वार; पुण्यात अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी

एकमेकांकडे पाहिल्याचा राग अन् थेट डोक्यावर वार; पुण्यात अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी

Follow Us
Follow Us:
  • १६ वर्षीय मुलावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला
  • उत्तमनगर पोलिसांकडून दोघांना अटक
  • हल्ल्यात अल्पवयीन गंभीर जखमी
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकमेकांकडे पाहण्याच्या क्षुल्लक वादातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना उत्तमनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुशांत विलास ढिले (वय ३२, रा. भवानीमाता कॉम्प्लेक्स, उत्तमनगर) आणि सचिन राजू मारणे (वय २७, रा. अचानक चौक, न्यू कोपरे गाव, उत्तमनगर) अशी आहेत. या प्रकरणी जखमी मुलाने उत्तमनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित १६ वर्षीय मुलगा शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) रात्री आठच्या सुमारास आपल्या मित्रासोबत शिवणे परिसरातील सरस्वतीनगर येथे थांबला होता. त्यावेळी आरोपी तेथे आले. एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. या वादातून आरोपींनी अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केला. आरोपींनी मुलाच्या डोक्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला.

हे सुद्धा वाचा : ऊसदराची कोंडी कोण फोडणार? पहिली उचल किती मिळणार? कारखानदारांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणातील सुशांत ढिले आणि सचिन मारणे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका साथीदाराविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हल्ल्यात झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण करीत आहेत. हल्ल्यामागील नेमकी परिस्थिती आणि गुन्ह्यातील इतर बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

हे सुद्धा वाचा : जमिनीचा वाद अन् हत्येची सुपारी! व्यावसायिकावर कटरने हल्ला; पुण्यातील घटनेनं खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: अल्पवयीन मुलावर हल्ला का करण्यात आला?

    Ans: एकमेकांकडे पाहण्याच्या क्षुल्लक वादातून आरोपींनी १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करून त्याच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.

  • Que: अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याप्रकरणी कोणाला अटक झाली?

    Ans: उत्तमनगर पोलिसांनी सुशांत विलास ढिले (वय ३२) आणि सचिन राजू मारणे (वय २७) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: अल्पवयीन मुलावर हल्ला कुठे आणि कधी झाला?

    Ans: शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास पुण्यातील शिवणे परिसरातील सरस्वतीनगर येथे ही घटना घडली. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण करीत आहेत.

Web Title: A shocking incident involving an attack on a minor has taken place in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Hingoli Crime News: हिंगोलीत रक्ताचे नाते ठरले वैरी! पाण्याच्या वादातून पुतण्याने केली काका-काकूची निर्घृण हत्या
1

Hingoli Crime News: हिंगोलीत रक्ताचे नाते ठरले वैरी! पाण्याच्या वादातून पुतण्याने केली काका-काकूची निर्घृण हत्या

जमिनीचा वाद अन् हत्येची सुपारी! व्यावसायिकावर कटरने हल्ला; पुण्यातील घटनेनं खळबळ
2

जमिनीचा वाद अन् हत्येची सुपारी! व्यावसायिकावर कटरने हल्ला; पुण्यातील घटनेनं खळबळ

दानोळीतील महेश दळवी खून प्रकरणाचा उलगडा, चार संशयितांना अटक; आठ दिवसांची पोलीस कोठडी
3

दानोळीतील महेश दळवी खून प्रकरणाचा उलगडा, चार संशयितांना अटक; आठ दिवसांची पोलीस कोठडी

अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, कोठडीत दुखापत अन् मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ
4

अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, कोठडीत दुखापत अन् मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.