Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाची हत्या; दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने पहिल्या प्रियकराला संपवलं

अर्जुनचा मृतदेह लोणार सरोवरतील यज्ञेश्वर मंदिराजवळील दर्गा रोडच्या बाजूला घनदाट जंगलातील जाळीत फेकून देण्यात आला होता. अर्जुन दिलीप रोडगे हा शुक्रवारपासून (दि. 2) बेपत्ता होता. याबाबत त्याचे वडील दिलीप बाबाराव रोडगे यांनी सेलू पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. 3) तक्रार दाखल केली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 08, 2024 | 02:45 PM
परभणीच्या प्रियकर-प्रेयसीला अटक

परभणीच्या प्रियकर-प्रेयसीला अटक

Follow Us
Follow Us:

लोणार : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने प्रेयसीने पहिल्या प्रियकराची हत्या घडवून आणली. प्रेयसीने लोणार सरोवरात फिरण्याच्या बहाण्याने आणल्यानंतर नियोजित कटानुसार दबा धरून बसलेल्या प्रियकराने मागून गळा आवळत खून केला.

हेदेखील वाचा : यशश्री शिंदे यांचा आरोपी दाऊद शेखला सहा दिवसाची पोलीस कोठडी

यामध्ये हत्या झालेला मृतक व आरोपी हे परभणी जिल्ह्याचे रहिवासी आहेत. मृत तरुण बेपत्ता असल्याने त्याचा शोध घेत असताना गावातील विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आल्यानंतर खुनाचा गुन्हा उघडकीस आला.पोलिसांनी आरोपी प्रियकर व प्रेयसीस अटक केली आहे.

अर्जुन दिलीप रोडगे (28, रवळगाव, ता. सेलू, जि. परभणी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अर्चना विठ्ठल सरोदे (29, रवळगाव, ता. सेलू) व ज्ञानेश्वर उर्फ माऊली आहेलाजी डुकरे (24, खडुळा, ता. पाथरी, जी. परभणी) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात आणखी एका आरोपीचा सहभाग असून, त्याचाही शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

हेदेखील वाचा : तब्बल 100 सीसीटीव्ही तपासून लावला ‘त्या’ ट्रकचालकाचा शोध, असा अडकला जाळ्यात

मृत अर्जुनचा मृतदेह लोणार सरोवरतील यज्ञेश्वर मंदिराजवळील दर्गा रोडच्या बाजूला घनदाट जंगलातील जाळीत फेकून देण्यात आला होता. अर्जुन दिलीप रोडगे हा शुक्रवारपासून (दि. 2) बेपत्ता होता. याबाबत त्याचे वडील दिलीप बाबाराव रोडगे यांनी सेलू पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. 3) तक्रार दाखल केली होती. सेलू पोलिसांनी तपासचक्रे जलदगतीने फिरविली.

अर्जुनचे रवळगावातीलच अर्चना हिच्याशी अनैतिक संबंध

अर्जुन रोडगे याचे रवळगावातीलच अर्चना हिच्याशी अनैतिक संबंध असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार महिलेस ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारी अर्चना पोलिसांसमोर शरण आली. ज्ञानेश्वर डुकरे या आपल्या प्रियकराच्या मदतीने लोणार सरोवरात गळा आवळून अर्जुनचा खून केल्याची कबुली तिने दिली.

Web Title: Murder of youth in lonar due to love tringle nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 02:45 PM

Topics:  

  • crime news
  • parbhani crime

संबंधित बातम्या

भाडेकरू बनून घरमालकांनाच लुटले, पोलिसांनी ‘बंटी-बबली’ दाम्पत्याला ठोकल्या बेड्या; तब्बल…
1

भाडेकरू बनून घरमालकांनाच लुटले, पोलिसांनी ‘बंटी-बबली’ दाम्पत्याला ठोकल्या बेड्या; तब्बल…

Sambhajinagar Murder : पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या
2

Sambhajinagar Murder : पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या

Madhya Pradesh : गरिबाला सिंह यांच्या घरी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाले ३ संशयित, पोलिसांचा तपास सुरू
3

Madhya Pradesh : गरिबाला सिंह यांच्या घरी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाले ३ संशयित, पोलिसांचा तपास सुरू

Gurbir Singh: ‘ …म्हणून मुंबई प्रेस क्लबने केलेली हकालपट्टी’! कोर्टाचा अंतरिम दिलासा देण्यात नकार
4

Gurbir Singh: ‘ …म्हणून मुंबई प्रेस क्लबने केलेली हकालपट्टी’! कोर्टाचा अंतरिम दिलासा देण्यात नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.