crime (फोटो सौजन्य: social media)
नागपूरच्या प्रसिद्ध हल्दीराम समूहाची ९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक समोर आलं आहे. मुंबईतील चार व्यापाऱ्यांनी ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. फसवणूक करणाऱ्यांनी हल्दीराम समूहाला त्यांच्या कंपनीची बनावट कागदपत्रे आणि त्या कंपनीचा खोटा स्टॉक दाखवत ही फसवणूक केली आहे. आरोपींचे नावे समीर अब्दुल हुसेन लालानी, त्याची पत्नी हिना समीर लालानी, मुलगा आलिशान समीर लालानी, आणि भागीदार प्रकाश भोसले असे आहे.
Chhatrapati Sambhajinagar News: अर्धनग्न करत कामगाराला अमानुष मारहाण; जागीच मृत्यू; कारण अस्पष्ट
पुढे आलेल्या माहितीनुसार, या चौघांनी सुक्या मेव्यावर प्रक्रिया करणारी ‘रॉयल फूड इंडस्ट्री’ त्यांच्या मालकीची असल्याचे सांगितले आणि कंपनी दरवर्षी १५ कोटी रुपयांची उलाढाल करत असल्याचे सांगून आमच्याकडे मोठ्या प्रमाणात कच्चा माल आल्याचे दर्शवणारी कागदपत्रे तयार केली. हल्दीराम समूहाने त्या आधारावर ‘रॉयल फूड इंडस्ट्री’ मध्ये गुंतवणूक करण्यास तयार झाले. आरोपींना हल्दीराम समूहाला गुंतवणुकीच्या बदल्यात त्यांच्या शेअर्स ठराविक वाटा देण्याचे आमिष दाखविले. मात्र गुंतवणूक करून देखील त्यांना रॉयल फूड इंडस्ट्रीजमध्ये हवा असलेला समभागातील वाटा मिळाला नाही. त्यानंतर हल्दीराम समूहाच्या अधिकाऱ्यांनी नागपूरचा कळमना पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही केली जात आहे. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
फेसबुकवर व्यवसायाचं आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक; नैराश्यात एकाने संपवलं आयुष्य
दरम्यान नाशिक मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुकवर व्यवसायाचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तणावात आणि नैराश्यात असलेल्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रशांत पाटील असेल आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रशांत पाटील यांच्या पत्नी हर्षाली यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या पतीने फेसबुकवर https://www.facebook. com/padma.v.chikte या लिंकवरून संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हापको ऑइलचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे गुंतवले होते. या संधार्बत संबंधिताने मेल आयडी padmavchikte@gmail.com व मोबाईल क्रमांक 9156097805 चा वापर केला आहे.
प्रशांत पाटील आणि त्यांचे मित्र राजेश जीवन जाधव, हरिश्चंद्र पांडू भरसठ व मोहित संदीप एखंडे यांनी मिळून डिसेंबर 2023 ते 6 जून 2025 या दरम्यान कालावधीत एकूण ५५ लाख 79 हजार 300 रुपयांनी रक्कम विविध विविध बँक खात्यांमध्ये जमा केली. पैसे परत न मिळाल्याने आणि संपूर्ण रक्कम कर्जावर घेतल्याने आर्थिक तणावात आलेल्या प्रशांत पाटील यांनी आत्महत्या केली. यांनतर त्यांच्या पत्नीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक! प्रेमाला घरातून विरोध म्हणून दोघांनी घेतला टोकाचा निर्णय, पोलिसांनी मृतदेह पाहताच…