काय नेमकं प्रकरण?
सनाचा विवाह २०२४ या वर्षी शोएब, उर्फ सैफ अयुब खान (वय ३०) याच्याशी झाला होता. लग्नापासून सासरचा छळ पैश्यांसाठी सुरु झाला होता. या असह्य छळाला कंटाळून सनाने ७ एप्रिल रोजी सायंकाळी 5:00 वाजता आपल्या राहत्या घरी एका ब्लँकेटच्या साहाय्याने गळफास घेत जीवन संपवलं.
Jalna Crime: आईला मेसेज केल्याचा राग; अल्पवयीन मित्राकडून मित्राची धारदार शस्त्राने हत्या
सनाचा पती, सासरा नसीम आयुब खान (वय 57), सासू (वय 54) आणि नणंद समीना उर्फ सोनी अनीस खान (वय 35) हे सतत हुंड्यासाठी पीडितेकडे पैशांची मागणी करत होते, असा आरोप आहे. पोलिसांनी गणेशपेठ पोलिसांनी पतीसह चारही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास सुरु आहे. हा तपास पोलीस उपनिरीक्षक नीलम घोडके यांच्यामार्फत केला जात असल्याची माहिती आहे. आपण 21 व्या शतकात राहत असलो तरीही महिलांच्या सुरक्षेचा आणि हुंड्यांसारख्या प्रथांचे प्रश्न आजही समोर येऊ लागले आहेत.
‘मी तुमच्यावर खूप प्रेम करते…’ चिठ्ठी लिहून विवाहितेची आत्महत्या; पतीवर मानसिक त्रासाचे आरोप
नागपूर जिल्ह्यातील कोरडीच्या महादुला परिसरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मयुरी मेंढे असं मृतक विवाहितेचा नाव आहे. आत्महत्येपूर्वी तिने भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
काय घडलं नेमकं?
गेल्या काही दिवसांपासून मयुरी आणि तिच्या पतीमध्ये वाद होत असल्याची माहिती आहे. त्यातून मानसिक ताण वाढला आणि महिनाभरापूर्वीच माहेरी परतली होती. या दरम्यान पतीशी संपर्क साधण्याचा मयुरीने प्रयत्न केला, पण फोन न उचलल्याने ती हताश झाली होती. नैराश्यात बुडालेल्या मयुरीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. घरातील मंडळी बाहेर गेले असताना तिने गळफास घेत आत्महत्या केली.
Ans: हुंड्याच्या छळाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले.
Ans: पती, सासरा, सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
Ans: चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






