व्यापाऱ्याला मारहाण करून हातपाय तोडले
नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरात बेस पॉवर हाऊसजवळ रस्त्याचं काम सुरू होत. रस्त्याचं काम सुरु असतांना जेसीबीने खोदकाम सुरु होत. या दरम्यान चार मानवी सांगाडे मिळाले आहेत. हा प्रकार सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे.
चार मानवी सांगाडे सापडल्यानंतर पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. हे सांगाडे नेमके कोणाचे आहे, हे अद्याप समजू शकले नाही आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
नागपूरच्या उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी खोदकाम सुरु आहे. खोदकाम सुरु असतांना मानवी सांगाडा सापडला. जेसीबीचा पंजा मानवी कवटीला लागले आणि मशीन ऑपरेटरने काम थांबवले. त्यांनंतर सक्करदरा पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलीस इन्स्पेक्टर मुकुंद ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने मोठ्या काळजीपूर्वक बऱ्यापैकी कुजलेल्या अवस्थेत सांगाडा बाहेर काढला. काही आठवड्यापूर्वी पुरण्यात आला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टम करिता पाठविण्यात आलं आहे. उशीरा रात्रीपर्यंत निर्माण कार्यातील कामगार, तसेच परिसरातील रहिवाशांचे जबाब नोंदवून घेण्यात येत होते.
Latur News: लातूर हादरलं! फेसबुक लाईव्ह करत तरुणाने छातीत सुरा खुपसून संपवले जीवन
लातूर: लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुक लाईव्ह करत एका तरुणाने छातीत सुरा खुपसून घेऊन आत्महत्या केली. या घटनेने लातूर जिल्हा हादरला आहे. या तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव भरत बालाजी सागावे (वय ३२) असे आहे. भरत हा लातूर जिल्ह्यातील अंबुलगा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
भरत हा अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास होता. ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास तो निलंगा शहरातील लांबोटकर पेट्रोल पंपाजवळ आंब्याच्या झाडाखाली बसून फेसबुक लाईव्ह करत होता. “मी आत्महत्या करत आहे” असे सांगत त्याने काही वेळानंतर छातीत सुरा खुपसला. नातेवाईकांनी फोन करून समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने फोन बंद करून टाकला होता