Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Crime: चंद्रपूरमध्ये १९ वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; पैशांच्या वादातून टोकाचे पाऊल

चंद्रपूर जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटना घडल्या. पोंभुर्ण्यात १९ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वरोऱ्यात दुचाकी अपघातात मामा गंभीर जखमी झाला. तर कोरपन्यात शॉर्टसर्किटमुळे स्वयंपाकघराला आग.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 18, 2026 | 02:35 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पोंभुर्ण्यात जत्रेच्या पैशांवरून वादानंतर तरुणाची आत्महत्या
  • वरोरा तालुक्यात दुचाकी अपघात; मामा गंभीर, भाचा किरकोळ जखमी
  • कोरपन्यात शॉर्टसर्किटमुळे स्वयंपाकघरात आग
चंद्रपूर: पोंभुर्णा शहरातील रामनगर परिसरातील एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, ही दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी ७वाजताच्या सुमारास उघडकीस आली. भारत प्रमोद गुरनुले (१९, रा. पोंभूर्णा) असे मृताचे नाव आहे.

भारत गुरनुले याने सोमवारी शिवरात्रीनिमित्त मार्कंड्याच्या जत्रेला जाण्यासाठी वडिलांकडे पैशांची मागणी केली होती. वडिलांनी पैसे नंतर देती, असे सांगितल्याने रागाच्या सायंकाळी तो ५ वाजताच्या सुमारास घराबाहेर निघून गेला,बराच वेळ झाला तरी तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान लुंबिनी बुद्ध विहाराच्या पटांगणातील विहिरीजवळ त्याची चप्पल आढळून आली. यामुळे संशय बळावल्याने कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

Amravati Crime: अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू

दुचाकी अपघातात मामा-भाचा जखमी

वरोरा तालुक्यातील महालगाव खुर्द येथील दीपक शत्रुघ्न श्रीरामे (२५) हे भाचा तेजस शेरकुरे (१५) याला घेऊन भटाळा येथे रविवारी दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परत येत असताना मांगली फाट्याजवळ समोरून आलेल्या वाहनाच्या तीन प्रकाशामुळे त्यांचे डोळे दिपले, त्यामुळे मोटरसायकलवरील त्यांचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. या अपघातात दीपक श्रीरामे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. भाचा तेजस यास मात्र थोडी दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी श्रीरामे यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविशंण्यात आले आहे.

शॉर्टसर्किटमुळे लागली स्वयंपाक खोलीत आग, साहित्य जळून खाक; कोरपनातील घटना!

कोरपना: कोरपना येथील एका घरातील स्वयंपाक खोलीत शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या आगीत घरातील अनेक संसार उपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली. शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये तुळशीराम लक्ष्मण मडावी यांचे घर आहे. त्यांच्या घरी फ्रिजला लावून असलेल्या प्लगमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे अचानकरित्या फ्रीजला लागून असलेल्या वायरने पेट घेतला घेतला. यातच बाजूला लागून असलेल्या गादी, अन्नधान्याचे कट्टे व घरातील अन्य साहित्याला आग लागली.

या घराता घटनेदरम्यान कोणीच नव्हते. तेव्हा मडावी यांची मुलगी काही कामानिमित्ता घरात आल्या असता. त्यांना आगीच्या धुरीचे लोट दिसून आले त्यांनी लागलीचा तत्काळ आजूबाजूच्या शेजाऱ्यांना कल्पना दिली. त्यांच्या मदतीने विद्युत पुरवठा बंद करून पाण्याच्या साह्याने आगीवर नियंत्रणा मिळवले. याच स्वयंपाक खोलीता सिलिंडर सुद्धा होता. दुर्दैवाने पुन्हाही आग भडकली असती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.

धक्कादायक ! पत्नीचा खून करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर; महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्येची घटना कुठे घडली?

    Ans: पोंभुर्णा शहरातील रामनगर परिसरात.

  • Que: दुचाकी अपघातात कोण जखमी झाले?

    Ans: दीपक श्रीरामे गंभीर जखमी, तेजस शेरकुरे किरकोळ जखमी.

  • Que: आगीचे कारण काय होते?

    Ans: फ्रिजच्या प्लगमधील शॉर्टसर्किटमुळे आग लागली.

Web Title: Chandrapur crime 19 year old youth commits suicide by jumping into well in chandrapur extreme step taken due to money dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Chandrapur Crime
  • crime

संबंधित बातम्या

Uttarpradesh Crime: चित्रपटालाही लाजवेल अशी घटना! पतीचा खून, प्रियकराच्या वरातीत नाचली आणि…
1

Uttarpradesh Crime: चित्रपटालाही लाजवेल अशी घटना! पतीचा खून, प्रियकराच्या वरातीत नाचली आणि…

Nagpur Accident: भरधाव वेगात बुलेटवर स्टंट ठरला जीवघेणा; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन मित्रांचा मृत्यू
2

Nagpur Accident: भरधाव वेगात बुलेटवर स्टंट ठरला जीवघेणा; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन मित्रांचा मृत्यू

Amravati Crime: अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू
3

Amravati Crime: अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Crime: विश्वासाचं भयावह रूप! मैत्रिणीने नशेची औषध दिलं, नंतर बलात्कार घडवून आणला अन् व्हिडीओ काढून…
4

Uttar Pradesh Crime: विश्वासाचं भयावह रूप! मैत्रिणीने नशेची औषध दिलं, नंतर बलात्कार घडवून आणला अन् व्हिडीओ काढून…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.