Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: चित्रपटालाही लाजवेल अशी घटना! पतीचा खून, प्रियकराच्या वरातीत नाचली आणि…

उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे एका महिलेने प्रियकराच्या मदतीने 45 वर्षीय पतीची हत्या करून मृतदेह लपवला. काही दिवसांनी तीच महिला प्रियकराच्या दुसऱ्या लग्नाच्या वरातीत नाचताना दिसली. पोलिस तपासात कट उघड झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 18, 2026 | 02:53 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रियकरासाठी महिलेने पतीच्या हत्येचा कट रचला.
  • मृतदेह लपवून काही दिवसांनी प्रियकराच्या लग्नात नाचली.
  • पोलिस तपासात गुन्हा उघड; महिला व प्रियकर अटकेत.
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या ४५ वर्षीय पतीची हत्या केली. त्यानंतर काही दिवसांनी आपल्या प्रियकराच्या लग्नाच्या वरातीत जाऊन नाचल्याचे समोर आले आहे. एका चित्रपटालाही लाजवेल अशी ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे?

Nagpur Accident: भरधाव वेगात बुलेटवर स्टंट ठरला जीवघेणा; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन मित्रांचा मृत्यू

काय घडलं नेमकं?

उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यातील मंझनपुर परिसरात ही घटना घडली. एका महिलेचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तिच्या घरच्यांनी तिचे लग्न एका 45 वर्षीय व्यक्तीसोबत लावून दिले. लग्नानंतर देखील तिचे प्रेमसंबंध सुरूच होते. पती तिच्या आणि प्रियकराच्या नात्यात अडथळा ठरत होता. त्यामुळे, तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला कायमचे संपवण्याचा कट रचला.

महिलेने प्रियकराच्या साथीने आपल्या पतीची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह लपवून टाकला. काही दिवसानंतर, जेव्हा महिलेचा प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत लग्न करत होता, तेव्हा ही महिला चक्क त्याच्या लग्नाच्या वरातीत पोहोचली आणि तिथे मनसोक्त नाचू लागली. तिचा हा निर्लज्जपणा पाहून अनेकांना आश्चर्य वाटले, पण पतीच्या हत्येमागे तिचाच हात असेल, असा संशय कोणाला आला नाही.

हत्येचा कट कसा आला समोर?

महिलेचा पती अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतांना त्यांना महिलेच्या प्रेमसंबंधांबद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी खाक्या दाखवताच महिलेने आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितले की, प्रियकराच्या मदतीने तिने पतीचा खून केला आणि मृतदेह लपवून टाकला.

पोलिसांनी आरोपी प्रियकराला त्याच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे मधुचंद्राच्या आधीच अटक केली. त्याची नवी नवरी सासरी त्याची वाट पाहत होती, पण तो पोलीस स्टेशनमध्ये होता.

पोलिसांनी काय दिली माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येचा कट पूर्वनियोजित होता. महिलेने पतीच्या हत्येनंतर प्रियकरासोबत लग्न करण्याचे ठरवले होते, पण प्रियकराने तिला धोका देऊन दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. याचा राग मनात धरून आणि त्याला धडा शिकवण्यासाठी ती त्याच्या वरातीत नाचायला गेली होती. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Amravati Crime: अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: पतीची हत्या का करण्यात आली?

    Ans: प्रियकराशी संबंधांमध्ये पती अडथळा ठरत असल्याने कट रचला गेला.

  • Que: प्रकरण उघड कसे झाले?

    Ans: पती बेपत्ता झाल्याने तक्रार दाखल झाली आणि पोलिस तपासात सत्य समोर आले.

  • Que: सध्या आरोपींची स्थिती काय आहे?

    Ans: महिला आणि तिच्या प्रियकराला अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Web Title: Uttar pradesh crime an incident that would embarrass even a film husband murdered danced at lovers wedding and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
2

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
3

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
4

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.