Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: बुधवार ठरला घातवार! नकारातून तरुणीचा खून, रामझुला पुलाखाली अज्ञात तरुणाची निर्घृण हत्या

नागपुरात एकाच दिवशी दोन खळबळजनक हत्या उघडकीस आल्या. मानकापूरमध्ये शेजाऱ्याने तरुणीचा गळा दाबून खून करून आत्महत्येचा बनाव केला, तर रामझुला पुलाखाली अज्ञात तरुणाची दगडाने निर्घृण हत्या झाली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 22, 2026 | 11:43 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मानकापूरमध्ये विवाहित शेजाऱ्याने 23 वर्षीय तरुणीची हत्या; आरोपी अटकेत
  • तरुणीशी जवळीक नाकारल्याने संतापातून खून, नंतर आत्महत्येचा बनाव
  • तहसील हद्दीत रामझुला पुलाखाली अज्ञात तरुणाचा दगडाने खून, ओळख अज्ञात
नागपूर: मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेजारी राहणाऱ्या विवाहित पुरुषाने तरुणीची हत्या केली. आरोपीने आधी तरुणीचा गळा दाबून खून केला आणि नंतर फासावर लटकवून आत्महत्येचा बनाव केला. प्राची हेमराज खापेकर (२३, रा. राजलक्ष्मी सोसायटी, गोधनी रोड) असे मृताचे तर शेखर ढोरे (३८) असे शेजारी राहणाऱ्या आरोपीचे नाव आहे. प्राचीची आई रुक्मिणी खापेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे. शवविच्छेदन अहवालात प्राचीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले.

काही महिन्यांपासून शेखर प्राचीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले होते.कुटुंबीयांनी प्राचीला त्याच्यापासून दूर राहण्यास सांगितले होते. प्राचीनेही बोलणे बंद केल्याने शेखर संतापला होता. सोमवारी सकाळी घरी कुणी नाही हे बघून शेखर तिच्या घरात शिरला. बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्राचीने नकार दिला. यावरून शेखर संतापला आणि त्याने प्राचीचे डोके जमिनीवर आपटले आणि गळा दाबून खून केला.

डोक्यात दगड घालून अनोळखी तरुणाची हत्या

नागपूर तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत रामझुला पुलाखाली बुधवारी अज्ञात तरुणाची डोक्यावर व चेहऱ्यावर दगड घालून निघृण हत्या केली. मृत तरुणाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे आहे. त्याच्या अंगावरील कपडे व एकूण दिसण्यावरून तो कामगार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याची ओळख पटविण्यासाठी व कोणतेही कागदपत्र किंवा साहित्य आढळले नाही. बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास रुग्णवाहिका चालकाच्या निदर्शनास पुलाखाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आला.

त्याने तत्काळ याबाबत नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच तहसील पोलिस ठाण्याचे अधिकारी संजय मेंढे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील फळ विक्रेते व चहावाल्यांकडे चौकशी केली. मात्र, मृताला ओळखणारा कोणीही भेटला नाही. त्यामुळे मृताची ओळख पटली नाही. मृताच्या उजव्या हातावर इंग्रजीत ‘RS’ अशी आद्याक्षरे गोंदवलेली असून, कानामागे ‘रमेश’ असे नाव गोंदवलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संशयितांमध्ये चार तरुण

मृतदेह घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला. परिसरातील काही दुकानदारांनी रात्री साडेनऊच्या सुमारास तीन ते चार तरुण या भागात फिरताना दिसल्याचे सांगितले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मानकापूर हत्येचा मुख्य आरोपी कोण?

    Ans: शेजारी राहणारा शेखर ढोरे (38).

  • Que: दुसरी घटना कुठे घडली?

    Ans: नागपूर तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामझुला पुलाखाली.

  • Que: अज्ञात तरुणाची ओळख पटली का?

    Ans: अद्याप ओळख पटलेली नाही; पोलिस तपास सुरू आहे.

Web Title: Nagpur crime two murders in nagpur on the same day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 08:22 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Dr Nitin Thorve यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण, पोलिसांवर १५ कोटी मागितल्याचा आरोप!
1

Dr Nitin Thorve यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण, पोलिसांवर १५ कोटी मागितल्याचा आरोप!

Nagpur Luxury Township: नागपुरात लक्झरी रिअल इस्टेटला नवी झळाळी! क्रिसाला डेव्हलपर्स आणि एलेव्हा बाय हिरानंदानी एकत्र
2

Nagpur Luxury Township: नागपुरात लक्झरी रिअल इस्टेटला नवी झळाळी! क्रिसाला डेव्हलपर्स आणि एलेव्हा बाय हिरानंदानी एकत्र

Nagpur Crime : शेंगांचा ठेला ते एमडीचा धंदा; ३०० रुपये रोज कमावणारा ‘फल्ली’ कसा बनला कोट्यधीश
3

Nagpur Crime : शेंगांचा ठेला ते एमडीचा धंदा; ३०० रुपये रोज कमावणारा ‘फल्ली’ कसा बनला कोट्यधीश

Fake Currency News: घरमालकाला दाखवला चाकू, अन् आत सुरू होता नोटांचा खेळ! नागपूरमधील धक्कादायक प्रकार उघड
4

Fake Currency News: घरमालकाला दाखवला चाकू, अन् आत सुरू होता नोटांचा खेळ! नागपूरमधील धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.