Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू

कामावरून कुटुंबासह दुचाकीवरून घरी परतत होते... मात्र जामठ्यात पाठीमागून भरधाव ट्रेलर आला अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. भीषण धडकेत पती-पत्नीसह चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 04, 2026 | 10:44 AM
Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू

Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • ट्रेलरच्या धडकेत पती-पत्नीसह चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू
  • सहा वर्षांचा मुलगा गंभीर; एम्समध्ये उपचार सुरू
  • अपघातानंतर ट्रेलर चालक पसार; पोलिसांकडून शोध सुरू
नागपूर : कामावरून कुटुंबासह दुचाकीवरून घरी परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. नागपूरच्या वर्धा मार्गावरील जामठा परिसरातील गौसी-मानापूरजवळ भरधाव ट्रेलरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पती-पत्नी आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नागपूर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

हेही वाचा:धक्कादायक प्रकार; भररस्त्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची गोळ्या झाडून हत्या; हत्येची जबाबदारी घेणारी पोस्ट व्हायरल

दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश नाईक हे पत्नी सुनीता नाईक आणि दोन मुलांसह दुचाकीवरून जात होते. जामठा परिसरातील गौसी-मानापूरजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर एवढा होता की, दुचाकीवरील चौघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात योगेश नाईक, त्यांची पत्नी सुनीता नाईक आणि चार वर्षांचा मुलगा गुलशन नाईक यांना गंभीर दुखापत झाली. मात्र, दुखापतींची तीव्रता अधिक असल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

सहा वर्षांचा मुलगा गंभीर

या दुर्घटनेत सहा वर्षांचा तन्मय नाईक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्याला तातडीने नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. योगेश नाईक हे मूळचे मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी होते. कामानिमित्त ते नागपुरात आले होते. बुटीबोरी एमआयडीसी परिसरात ते कुटुंबासह राहत होते. कामावरून घरी परतत असतानाच हा भीषण अपघात झाला.

हेही वाचा: आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये; आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’ला थेट ठोकले सील

ट्रेलर चालक घटनास्थळावरून पसार

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मात्र, अपघातानंतर ट्रेलर चालक वाहन घटनास्थळीच सोडून पसार झाला. पोलिसांकडून फरार चालकाचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. या भीषण दुर्घटनेमुळे नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Web Title: Nagpur jamtha trailer bike accident family three dead child injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • Accidendt
  • Accident Case
  • Accident News
  • crime news

संबंधित बातम्या

जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवरून आर्किटेक्टचे अपहरण; मारहाण करून सह्या घेतल्या अन्…
1

जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवरून आर्किटेक्टचे अपहरण; मारहाण करून सह्या घेतल्या अन्…

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू
2

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; 24 तासांत सराईत टोळी जेरबंद
3

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; 24 तासांत सराईत टोळी जेरबंद

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…
4

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.