Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीसोबत मिळून घरीच चालवायचा ‘तो’ देहव्यापाराचा धंदा; बडतर्फ पोलिसाचे घृणास्पद कृत्य

आरोपी सचिन मेश्राम हा नागपूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत होता. त्याला एका प्रकरणात सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. दरम्यान, ताजनगर परिसरात देह व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 02, 2025 | 09:56 AM
पत्नीसोबत मिळून घरीच चालवायचा 'तो' देहव्यापाराचा धंदा; बडतर्फ पोलिसाचे घृणास्पद कृत्य

पत्नीसोबत मिळून घरीच चालवायचा 'तो' देहव्यापाराचा धंदा; बडतर्फ पोलिसाचे घृणास्पद कृत्य

Follow Us
Follow Us:

नागपूर : ग्रामीण पोलिस दलातून बडतर्फ पोलिस कर्मचारी हा पत्नीसोबत मिळून घरीच देहव्यवसायाचा अड्डा चालवत होता. गरीब कुटुंबातील मुलींना पैशांचे आमिष दाखवून देह व्यवसायाच्या नरकात ढकलत होता. गोपनीय माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत ताजनगर परिसरातील पार्वती सहनिवास येथे त्याच्या घरी धाड टाकली. चार आरोपींना अटक करून दोन पीडितांची सुटका केली.

अटकेतील आरोपींमध्ये सचिन दिलीप मेश्राम (वय 35), सोनाली सचिन मेश्राम (वय 20, दोन्ही रा. ताजनगर, मानकापूर), आकाश अशोक जगनीत (वय 32, रा. कामठी) आणि एका 48 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन मेश्राम हा नागपूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत होता. त्याला एका प्रकरणात सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. दरम्यान, ताजनगर परिसरात देह व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग (एसएसबी) ला मिळाली होती. मुख्य आरोपी हा महिलांना ग्राहक पुरविण्याचे काम करत असल्याचे समजले. पोलिसांनी पुरावा गोळा करण्यासाठी आपला गुप्त पंटर ग्राहक म्हणून पाठवला. पंटरचा इशारा मिळताच पोलिसांनी छापा टाकला आणि चारही आरोपींना रंगेहात अटक केली.

पिंपरीतही पोलिसांची कारवाई

पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रांचच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने हिंजवडी परिसरातील कासारसाई येथे एका व्हिलामध्ये कारवाई करत चार परदेशी महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. एजंट महिला ग्राहकांना कासारसाई, लोणावळा परिसरात व्हिला बुक करण्यास सांगत त्यानंतर परदेशी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला माहिती मिळाली की, एक परदेशी महिला एजंट ग्राहकांना व्हॉट्सअप कॉल करून लोणावळा परिसरात व्हिला बुक करण्यास सांगते. त्यानंतर परदेशी महिलांना तिथे घेऊन जात त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेते. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावला असता, संबंधित परदेशी महिलेने एका ग्राहकाला हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कासारसाई येथे एक व्हिला बुक करण्यास सांगितले होते. नंतर ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Nagpur police took action against escort service nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 09:56 AM

Topics:  

  • crime news
  • Nagpur Crime News

संबंधित बातम्या

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
1

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…
2

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
3

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड
4

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.