crime (फोटो सौजन्य: social media )
नागपूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यापाऱ्याला गोळीबार करत दरोडेखोरांनी लुटल्याचे समोर आले आहे. या घटनेत व्यापारी जखमी झाला आहे. ही घटना नागपूरच्या कडबी चौकात भर रस्त्यावर बुधवारी रात्री घडली आहे. या घटनेने नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी लुटलेली रक्कम हवालाशी निगडित असल्याचा संशय आहे.
नेमकं काय घडलं?
राजू दिपानी (जरीपटका) असे जखमीचे नाव आहे. ते व्यापारी असून गुजरातमधील एका कंपनीसाठीदेखील डेटा फिडिंगचे काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे 10 नंबर पुलाजवळ कार्यालय आहे. रात्री आठ वाजताच्या सुमारास राजू दिपानी कार्यालयातून निघाले व चौकातून आतील भागात शिरले. तेथे बाबा नावाच्या व्यक्तीच्या घरासमोरून ते दुचाकीने जात असताना मोटारसायकलवरून दोन आरोपी आले व त्यांनी दिपानी यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात स्प्रे पाहून दिपानी यांनी धोका ओळखून तेथून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांच्यावर पिस्तुलाने तीन गोळ्या झाडल्या. त्यांच्याकडील ५० लाख रुपये लुटले. राजू दिपानी हे या घटनेत जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. बंधित रक्कम हवालाशी निगडीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
१६ वर्षीय विद्यार्थिनीची निर्घृण हत्या, शाळेतून घरी परतत असतांना तिची वाट अडवली आणि
दरम्यान, नागपूर शहरात एका शाळकरी मुलीची हत्या 30 ऑगस्ट रोजी घडल्याचा प्रकार समोर आला होता. शाळेतून घरी जात असतांना तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आली होती. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमोहर कॉलनीत ही हत्या झाली. मृत मुलगी दहाव्या वर्गात शिक्षण घेत होती. घटनेची माहिती मिळताच अजनी पोलीस ठाण्याचे निरीक्षक, पोलीस कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपी हा अल्पवयीन आहे. त्यामुळे एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु असून आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची अनेक पथक रवाना झाली आहे. या हत्याकांडाने नागपूर शहर हादरलं आहे.
Mumbai Police : ऑनलाइन फसवणुकीची भीती वाटतेय? मग फॉलो करा मुंबई पोलिसांचा ‘एबीसीडी’ फॉर्म्युला