Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime: सक्षम ताटे हत्याकांडाला नवं वळण! मृतदेहाशी लग्न करणारी आंचल सासर सोडून गेली; आई म्हणाली- आता मी एकटीच उरले

नांदेडमधील सक्षम ताटे हत्याकांडाला भावनिक वळण मिळाले आहे. सक्षमच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाशी लग्न करून सासरी राहण्याची शपथ घेणारी आंचल मामीडवार आता घर सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे. मुलाच्या मृत्यूनंतर पतीचाही मृत्यू झाल्याने सक्षमची आई पूर्णपणे एकटी पडली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 14, 2026 | 02:35 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सक्षम ताटे हत्याकांडानंतर आंचल मामीडवारने मृतदेहाशी लग्न करून सासरी राहण्याची शपथ घेतली होती.
  • काही महिन्यांनी आजीची तब्येत खराब असल्याचे सांगून आंचल घर सोडून गेली आणि परत आली नाही.
  • मुलाच्या मृत्यूनंतर पतीचाही मृत्यू झाल्याने सक्षमची आई आता एकटी पडली असून न्यायासाठी लढत आहे.
नांदेड : नांदेडमधील बहुचर्चित सक्षम ताटे हत्याकांडाला आता भावनिक वळण मिळाले आहे. (Nanded Crime)प्रेमसंबंधातून झालेल्या या ऑनर किलिंग प्रकरणानंतर सक्षम ताटेच्या मृतदेहाशी लग्न करून सासरी राहण्याची शपथ घेणारी आंचल मामीडवार आता सासरचे घर सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे. सक्षमच्या आईने एका वृत्तसंस्थेशी बोलताना आपली व्यथा मांडली असून, मुलाच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले आहे.(Nanded Crime)

काय नेमकं प्रकरण?

सहा महिन्यांपूर्वी नांदेडमध्ये सक्षम ताटे याची गोळ्या झाडून आणि फरशीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. आंचल मामीडवार हिच्यासोबत सक्षमचे प्रेमसंबंध होते. मात्र, जात वेगळी असल्यामुळे आंचलच्या कुटुंबीयांनी या नात्याला विरोध केला होता. त्यातूनच सक्षमची हत्या झाल्याचा आरोप आहे.  या प्रकरणात आंचलच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल असून ते सध्या तुरुंगात आहेत.(Nanded Crime)

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, 15 शस्त्र परवाने रद्द; तब्बल 68 जणांचे अर्ज फेटाळले

ती माहेरी गेली मात्र परतली नाही 

सक्षमच्या मृत्यूनंतर आंचलने त्याच्या मृतदेहाशी लग्न करत, “मी सक्षमच्या आई-वडिलांची मुलासारखी काळजी घेईन आणि सक्षमला न्याय मिळवून देईन,” अशी शपथ घेतली होती. काही महिने ती सक्षमच्या घरी राहत होती. मात्र, आजीची तब्येत बिघडल्याचे कारण सांगून ती माहेरी गेली आणि त्यानंतर परत आली नसल्याचे सक्षमच्या आईने सांगितले.

आता घरात मी एकटीच उरले

सक्षमच्या आई संगीता ताटे यांनी सांगितले की, “मुलाच्या मृत्यूनंतर माझे पती पूर्णपणे खचून गेले होते. काही दिवसांनी त्यांचंही निधन झालं. आता घरात मी एकटीच उरले आहे. मुलाला न्याय मिळवून देण्यासाठीच जगत आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, सरकारकडून मदत आणि नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. तसेच आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा ऑनर किलिंग आणि आंतरजातीय प्रेमसंबंधांवरील सामाजिक दबावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (Nanded Crime)

 

Chhattisgarh Crime: धक्कादायक! १३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; दुचाकीवरून फिरवण्याचा बहाण्याने नेले…

💡

Frequently Asked Questions

  • Que: सक्षम ताटे हत्या प्रकरण नेमकं काय आहे?

    Ans: आंतरजातीय प्रेमसंबंधांना विरोध असल्यामुळे सक्षम ताटेची हत्या झाल्याचा आरोप आंचल मामीडवारच्या कुटुंबीयांवर आहे.

  • Que: आंचल मामीडवारने सक्षमच्या मृत्यूनंतर काय केलं होतं?

    Ans: आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करून त्याच्या आई-वडिलांची काळजी घेण्याची आणि न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली होती.

  • Que: सक्षमच्या आईने कोणती भीती व्यक्त केली आहे?

    Ans: आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती सक्षमच्या आईने व्यक्त केली आहे.

Web Title: Nanded crime a new twist to the saksham tate murder aanchal who married the corpse left her father in law mother said now i am left alone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.