Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime: नांदेडमध्ये गुरुद्वाराजवळ गोळीबाराचा थरार; 24 तासांत पोलिसांची मोठी कारवाई, दोन्ही गटांतील 10 आरोपी अटकेत

नांदेडच्या लंगर साहेब गुरुद्वारा परिसरात दोन गटांत वादातून गोळीबार झाला. भररस्त्यात राडा झाल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी 24 तासांत सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे दोन्ही गटांतील 10 आरोपींना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 05, 2026 | 08:50 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • गुरुद्वाराजवळ वादातून गोळीबार; एक जखमी
  • दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल
  • पोलिसांची जलद कारवाई; 24 तासांत 10 आरोपी अटकेत
नांदेड: नांदेडमधून गोळीबाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. लंगर साहेब गुरुद्वारा (नगीना घाट) परिसरात दोन गटात वाद झाला होता. याच वादातून गोळीबाराची खळबळजनक घटना घडली होती. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. पोलिसांनी वेगाने आपली चक्रे फिरवत अवघ्या २४ तासांच्या आत दोन्ही गटातील एकूण १० आरोपींना अटक केली आहे. परिसरात तणावाची परिस्थती नियंत्रणात आणली आहे.

Vasai Crime: जामिनासाठी खर्च केलेल्या पैशांवरून बहिणीवर गोळीबार; घरातून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त

दोन्ही बाजूने गुन्हा दाखल

गोळीबार प्रकरणी दोन्ही बाजूने परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका गटातर्फे हॉटेल चालक कमलप्रितसिंग सिंधु यांनी फिर्याद दिली की, यात्रेकरूंसोबत सुरु असलेला वाद सोडवण्यासाठी गेले होते. एका ३० ते ३५ वर्षीय यात्रेकरुने त्यांच्यावर पिस्तूल झाडून जखमी केले. यावरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाला.

तर दुसऱ्या बाजूने पंजाबमधील रहिवासी लवप्रीतसिंग चहल यांनी फिर्याद दिली की, जुन्या वादाचा राग मनात धरून स्थानिकांनी त्यांच्यावर तलवारी आणि काठ्यांनी हल्ला केला.

दोन्ही गटातील १० आरोपींवर अटकेची कारवाई

पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गाठले. परिसरात तणावाची परिस्थतीत निर्माण झाली होती, पोलिसांनी निर्माण झालेली परिस्थतीत नियंत्रणात आणली आहे. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पाच पथके तयार केली होती. सीसीटीव्ही फुटेज, सायबर सेलचे तांत्रिक विश्लेषण आणि नॅटग्रिड माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. यामध्ये अकोला, अर्धापूर, बीदर आणि पंजाबमध्ये पथके रवाना करण्यात आली होती. पोलिसांनी अकोला आणि बुलढाणा पोलिसांच्या मदतीने आरोपींचा पाठलाग करून मुख्य आरोपींसह सात जणांना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्याचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही गटांतील 10 आरोपींवर अटकेची कारवाई केली आहे. यात गोळीबार करणाऱ्या सात यात्रेकरू आणि दुसऱ्या गटातील तीन स्थानिक आरोपींचा समावेश आहे. अत्यंत संवेदनशील अशा या घटनेचा तपास कौशल्याने करून आरोपींना तातडीने जेरबंद केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

Crime News: मैत्री की दुश्मनी? दुचाकी हरवली म्हणून मित्राचंच केलं फिल्मी स्टाईल अपहरण, तर अवघ्या दोन तासात पोलिसांकडून सुटका

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: नांदेडमधील लंगर साहेब गुरुद्वारा (नगीना घाट) परिसरात शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली.

  • Que: नेमकं काय घडलं?

    Ans: दोन गटांतील वादातून भररस्त्यात गोळीबार व मारहाण झाली, त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: सीसीटीव्ही, सायबर तपास व नॅटग्रिड माहितीच्या आधारे 24 तासांत दोन्ही गटांतील एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आली.

Web Title: Nanded crime a thrilling shootout near a gurdwara in nanded police take major action within 24 hours 10 accused from both groups arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा
1

DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा

Vasai Crime: जामिनासाठी खर्च केलेल्या पैशांवरून बहिणीवर गोळीबार; घरातून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त
2

Vasai Crime: जामिनासाठी खर्च केलेल्या पैशांवरून बहिणीवर गोळीबार; घरातून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त

Kalyan Crime: धक्कादायक! सासूनेच मित्राच्या मदतीने सुनेची केली निर्घृण हत्या; नोकरी-संपत्तीचा वाद ठरला कारण
3

Kalyan Crime: धक्कादायक! सासूनेच मित्राच्या मदतीने सुनेची केली निर्घृण हत्या; नोकरी-संपत्तीचा वाद ठरला कारण

Ahilyanagar Crime: हृदयद्रावक! कौटुंबिक वादानंतर जामखेडमध्ये बाप–लेकाची एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या
4

Ahilyanagar Crime: हृदयद्रावक! कौटुंबिक वादानंतर जामखेडमध्ये बाप–लेकाची एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.