मैत्री की दुश्मनी? दुचाकी हरवली म्हणून मित्राचंच केलं फिल्मी स्टाईल अपहरण (Photo Credit - AI)
कशी घडली घटना?
प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको परिसरात शुक्रवारी रात्री अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या अपहरणाने शहरात एकच खळबळ उडाली. एन-७ सिडको ग्रिव्हीज कॉलनीत राहणाऱ्या मनिषा समाधान गायकवाड यांचा मुलगा मयंक समाधान गायकवाड (१७ वर्षे ६ महिने) हा बारावीचा विद्यार्थी आहे. शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास मयंकचा मित्र आर्यन अनिल नैनाव (रा. म्हसोबानगर) त्याला घरी बोलवण्यासाठी आला. मित्रासोबत बाहेर जातो, असे सांगून मयंक घराबाहेर पडला. दोघे आर्यनच्या चेतक स्कुटीवरून एन-६ भागातून बजरंग चौकाकडे जात असताना अचानक मागून आलेल्या दोघांनी मयंकचा शर्ट पकडून त्याला ओढण्यास सुरुवात केली. स्कुटी वेगात नेत असताना तोल जाऊन दोघे खाली पडले. तेवढ्यात आणखी एक तरुण धावून आला. तिघांनी मिळून मयंकला फरपटत नेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या आणखी तिघांनी मयंकला जबरदस्तीने कारमध्ये (एमएच-२०-एचएच-४६६८) कोंबले, कारमधील पाच आणि दुचाकीवरील दोघे असे एकूण सात जण मयंकला घेऊन पसार झाले, ही घटना मयंकचा मित्र आर्यन याने गायकवाड कुटुंबीयांना कळवल्यानंतर उघडकीस आली.
उर्वरित आरोपींचा शोध सुरू..
अपहरण केलेल्या मुलाला आरोपी वाळूज परिसरात फिरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसानी वाळूज परिसर गातून अवघ्या दोन तासात मयंकची सुखरूप सुटका कैली तसेच आरोपींपैकी तिघांना बेड्या ठोकल्या, तर उर्वरित आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली,
कॉलेजमधील मित्रांच्या वादातून घडला प्रकार
तपासात धक्कादायक बाब समोर आली असून कॉलेजमधील मित्रांच्या एका ग्रुपमधील वादातून है अपहरण घडले, चार-पाव महिन्यांपूर्वी आरोपी रोहन ढवळे याची दुचाकी मंयक याला दिली होती. त्याने ती दुचाकी यश नावाच्या मित्राला दिली. मात्र, यशने ती दुचाकी गायब केली. रोहनच्या वडिलांनी दुचाकी कोठे आहे अशी वारंवार विचारणा करुन तगादा लावल्यानंतर आरोपी मुलांनी कट रचला. त्यानुसार, मयंक गायकवाड याचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले.






