
crime (फोटो सौजन्य: social media)
नांदेड: नांदेड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांच्या हत्येचा बदला मुलाने घेतल्याचे समोर आले आहे. १६ वर्षांपूर्वी झालेल्या वडिलांच्या हत्येचा बदला मुलाने एका व्यक्तीची हत्या करत घेतला आहे. हा धक्कदायक प्रकार नांदेड जिल्ह्यात घडला आहे. हत्या झालेल्या मृतकाचे नाव राष्ट्रपाल तुकाराम कपाळे (वय 39 रा. पंचशीलनगर ) अस आहे. पोलिसांनी या हत्येचा उलगडा अवघ्या तीन तासात करत आरोपीला अटक केली आहे आहे. आरोपी हा केवळ १९ ते २० वर्षांचा आहे.
Crime News: परदेशी नागरिकांना कर्जाचे आमिष दिले अन्…; सायबर पोलिसांकडून 4 जणांना अटक
काय घडलं नेमकं?
२००९ साली आरोपी नागेश गवळे (वय 20 रा.वाघाळा) याचे वडील राजेंद्र गवळे यांची हत्या करण्यात आली होती. या कटात तीन आरोपी सहभागी होते. यात मृतक राष्ट्रपाल कपाळे हा देखील सहभागी होता. काही वर्षांपूर्वी राष्ट्रपाल आणि त्यांचे इतर दोन साथीदारांची या हत्येच्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झाली. जेलमधून सुटल्यानंतर तो ऑटो चालवून उदरनिर्वाह करायचा, तसेच घरी किराणा दुकान देखील होते. दुसरीकडे वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नागेश गवळे हा षडयंत्र रचत होता आणि शेवटी तो दिवस आला.
शुक्रवारी रात्री सात वाजताच्या सुमारास राष्ट्रपाल हा दुकानात असल्याची माहिती आरोपीला मिळाली. त्यानंतर आरोपी नागेशने आपल्या इतर दोन साथीदारांना घेऊन तीक्ष्ण हत्याराने राष्ट्रपालच्या शरीरावर वार केले आणि फरार झाले. रक्तबंबाळ झालेल्या राष्टर्पलच्या घटनास्थळी मृत्यू झाला. नागिरकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पंचनामा करत आरोपींचा शोध घायला सुरुवात केली. तपासाची सूत्रे वेगाने फिरवत अवघ्या तीन तासांत आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींचे नाव नागेश राजेंद्र गवळे (वय 20.रा शाहूनगर वाघाळा), अभिजीत राणू गजभारे (वय 20 रा.धनेगाव), लकी राजकुमार पारखे (वय 19 रा.गौतमनगर किल्ला रोड) अशी आहे. वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी खून केल्याचे पोलीस तपासात प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
Crime News: लग्न लावून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मारहाण; दोघांना अटक
Ans: नागेश
Ans: राष्ट्रपाल
Ans: नांदेड