इचलकरंजी पोलिसांची धडक कारवाई (फोटो- istockphoto)
इचलकरंजी: मुलींसोबत लग्न लावून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करत तिघांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शब्बीर डोंगरीसाब शेख (वय 39 रा. समर्थनगर तारदाळ) शाबीर शेख व सोहेल शफिक शिरोळे अशी जखमींची नांवे आहेत. या प्रकरणी साहिल रशीद सय्यद (वय 20), साजीद रशीद सय्यद (वय 22 दोघे रा. समर्थनगर तारदाळ) व आरमान मोमीन (वय 24 रा. खोतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून सय्यद बंधुंना अटक करण्यात आली आहे.
पार्वती औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोर अडवत लग्नासंदर्भात विचारणा केली. त्यावर शेख यांनी नकार दिल्याने साहिल, साजीद सय्यद व आरमान मोमीन या तिघांनी शेख यांच्यासह त्यांचे भाऊ शाबीर शेख व सोहेल शिरोळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तर साहिल याने कटरने शिरोळे याच्या उजव्या हाताच्या दंडावर वार करुन जखमी केले. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून साहिल व साजीद सय्यद या दोघांना अटक करण्यात आली आहे.
हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण
सोलापूरमधून एक धक्कादायक आणि घृणास्पद घटना समोर आली आहे. पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी जवळील एका हॉटेल मालकाने मॅनेजरच्या चुकीमुळे नग्न करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. हॉटेल मधील मॅनेजरने चुकीमुळे त्याला अक्षरशः नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण केल्याचा हा व्हिडीओ वायरल झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणतीही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती समोर आली आहे.
Solapur Crime: धक्कादायक! हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण; व्हिडिओ व्हायरल
नेमकं काय प्रकरण?
हॉटेल मधील मॅनेजरने केलेल्या चुकीमुळे त्याला अक्षरशः नग्न करुन लोखंडी पाईपने मारहाण केल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही घटना टेंभुर्णी येथील हॉटेल 77 77 या हॉटेल मध्ये घडली आहे. मुजोर मालक लखन माने याने ही मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कदायक बाब म्हणजे ही मारहाण हॉटेलच्या सर्व स्टाफ समोर केली आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेबाबत मॅनेजर आणि हॉटेल मालक यांनी स्पष्टीकरण दिले आहे.






