समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित चिमुकली गुरुवारी शाळेत जाण्यास नकार देत होती. मुलीच्या या वर्तनामुळे तिच्या आईला शंका आली आणि तिने मुलीची विचारपूस केली. तेव्हा मुलीने घडलेला प्रकार सांगितला आणि शिक्षकाकडून तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. हा प्रकार ऐकताच मुलीच्या आईने तात्काळ भाग्यनगर पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली.
Nanded Crime: नांदेड हादरलं! कापूस वेचणीदरम्यान दोन सख्ख्या जावांचा गळा दाबून खून
तक्रार मिळताच पोलिसांनी तत्परतेने गुन्हा नोंदवला. आरोपी शिक्षकावर 64(2), 65(2), 351(2) BNS आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोक्सो कायद्यानुसार हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा मानला जातो आणि दोषींना कठोर शिक्षा होण्याची तरतूद आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे.
या घटनेविषयी माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजंने यांनी सांगितले की, या खटल्याची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात व्हावी यासाठी न्यायालयाला विनंती केली जाणार आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणांत लवकर न्याय मिळावा, यासाठी अशा केसेस फास्टट्रॅक कोर्टात चालवल्या जातात.
दरम्यान, या प्रकरणाने नांदेड शहरात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी, मुलींना सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अनेक पालकांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून शाळांमध्ये सुरक्षा आणि देखरेख वाढविण्याची गरज अधोरेखित केली आहे.
नांदेडमधील ही घटना अत्यंत धक्कादायक असून मुलांच्या सुरक्षेबाबतची परिस्थिती किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी सर्वांच्या मनातील एकच इच्छा आहे.




