Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: आई-वडिलांच्या साध्या ओरडण्याचा मनावर घेतला धसका; 21 वर्षीय मुलाने संपवले जीवन

बीड जिल्ह्यातील सांगवी (पाटण) येथे आई-वडिलांनी घरच्या कामावरून रागावल्याने 21 वर्षीय तरुणाने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 12, 2026 | 11:14 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बीड जिल्ह्यातील सांगवी (पाटण) येथे घटना.
  • आई-वडिलांनी घरच्या कामावरून रागावल्यानंतर तरुणाने टोकाचा निर्णय घेतला.
  • शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या.
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय तरुणाने आई- वडिलांच्या ओरडण्याचा राग मनात धरून गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथे घडली. विराज हरिदास भगत असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घरगुती कामात मदत करत नसल्याच्या कारणावरून पालकांनी त्याला रागावल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या दुर्दैवी घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

Amravati Crime: अमरावतीत धक्कादायक घटना! दारू, मारहाण आणि संतापाचा स्फोट; अमरावतीत पत्नीच्या प्रतिहल्ल्यात पतीचा मृत्यू

काय घडलं नेमकं?

विराज हा गेल्या काही दिवसांपासून घरच्या कामांकडे दुर्लक्ष करत होता. यामुळे त्याचे आई-वडील त्याच्यावर काहीसे नाराज झाले होते. मंगळवारी सकाळी पालकांनी त्याला ‘तू घरच्या कामात मदत का करत नाहीस?’ असे विचारत थोडे रागावले. सर्वांसमोर रागावल्याने विराजच्या जिव्हारी लागले. यातून आलेल्या नैराश्यातून त्याने सकाळी कोणालाही काही न सांगता घराबाहेर पाऊल टाकले. तो थेट गावातील काळशेट शिवारातील आपल्या मालकीच्या शेतात गेला आणि तिथे एका आंब्याच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

कशी उघडकीस आली घटना

विराज हा बराच वेळ घरी परतला नाही. त्यामुले त्याच्या कुटुंबीयांनी शोध घ्याला सुरुवात केली. अखेर त्याची बहीण त्याला शोधण्यासाठी शेतात गेली असता. तिला विराज झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. हे बघताच तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली ज्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने तिथे धाव घेतली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने खाली उतरवून कडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबियांवर शोककळा पसरली असून खळबळ उडाली आहे.

Pune Crime: पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना! नर्सिंग विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप

बस स्थानकाजवळ तरुणाची दगडाने ठेचून हत्या; शहरात खळबळ

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बस स्थानक परिसरातून एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव नौशाद असे आहे. तो गांधीनगर भागाचा रहिवासी आहे. त्याचा मृतदेह बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या एका पत्र्याच्या जवळ आढळला.

 

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: विराज हरिदास भगत (वय 21) असे मृत तरुणाचे नाव आहे.

  • Que: आत्महत्येमागचे कारण काय होते?

    Ans: घरच्या कामावरून आई-वडिलांनी रागावल्यानंतर विराजने ते मनावर घेतले आणि नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले.

  • Que: कुटुंबीयांना घटना कशी समजली?

    Ans: विराज बराच वेळ घरी न आल्याने शोध घेतला असता त्याची बहीण शेतात गेली आणि तो झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

Web Title: Beed crime took parents mild scolding to heart 21 year old son ends his life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Solapur Crime: माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार
1

Solapur Crime: माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार

Pune Crime: वानवडीत पोलिस-सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबार; 30 गुन्ह्यांचा आरोपी अटकेत
2

Pune Crime: वानवडीत पोलिस-सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबार; 30 गुन्ह्यांचा आरोपी अटकेत

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त
3

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त

Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला  घृणास्पद प्रकार
4

Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला घृणास्पद प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.