Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Crime: अमरावतीत धक्कादायक घटना! दारू, मारहाण आणि संतापाचा स्फोट; अमरावतीत पत्नीच्या प्रतिहल्ल्यात पतीचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथे दारूच्या नशेत पत्नीला वारंवार मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीच्या प्रतिमारहाणीत मृत्यू झाला. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून वलगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 12, 2026 | 10:40 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • Amravati जिल्ह्यातील खारतळेगाव येथे धक्कादायक घटना.
  • दारूच्या नशेत पतीकडून पत्नीला वारंवार मारहाण होत असल्याचा आरोप.
  • संतापलेल्या पत्नीने प्रतिकार करत पतीला मारहाण केली; त्यात मृत्यू.
अमरावती : अमरावती येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत पत्नीला नेहमी मारहाण करणाऱ्या पतीचा, पत्नीने केलेल्या प्रतिमारहाणीत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक वादाचे पर्यावसान थेट हत्येत झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या खारतळेगाव येथे घडली.

Pune Crime: पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना! नर्सिंग विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप

काय घडलं नेमकं?

मृत व्यक्तीचे नाव मंगेश देविदास गोटे (वय ४२) आहे. मंगेश हे खारतळेगावचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश यांना दारूचे मोठे व्यसन होते. ते रोज दारू पियुन घरी यायचे आणि विनाकारण पत्नीला शिवीगाळ करतो. केवळ शिवीगाळ नाही तर तो आपल्या पत्नीला अमानुषपणे मारहाणही करत होता. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असल्याने त्यांचे घरगुती वातावरण नेहमीच तणावपूर्ण असायचे.

नेहमीप्रमाणे मंगळवारी १० मार्च रोजी मंगेश गोटे पुन्हा एकदा दारूच्या नशेत धुंद होऊन घरी पोहोचले. घरी आल्यावर त्यांनी पुन्हा पत्नीसोबत वाद उकरून काढला आणि तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. रोजच्या या त्रासाला पत्नी पूर्णपणे कंटाळली होती. पतीकडून होणाऱ्या सततच्या मारहाणीमुळे तिचा सायं सुटला आणि संतापाच्या भरात तिने पतीला जोरदार प्रतिप्रत्युत्तर दिले.

रागाच्या भरात घडली घटना

रागाच्या भरात पत्नीने पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण इतकी गंभीर होती की मंगेश गोटे यांचा जागीच मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच गावात आणि परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. बुधवारी ११ मार्च रोजी या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

वलगाव पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. पोलीस उपयुक्त गाणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पत्नीने स्वतःच पतीला मारहाण
केल्याची कबुली दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे.

Pune Crime: कॅम्प परिसरात किरकोळ वाद जीवावर; सहा जणांनी तरुणावर वार करून केली हत्या

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथे घडली.

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय आहे?

    Ans: मंगेश देविदास गोटे (वय 42) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

  • Que: घटना कशी घडली?

    Ans: दारूच्या नशेत पतीने पत्नीला मारहाण केल्यानंतर संतापलेल्या पत्नीने प्रतिकार केला. त्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाला.

Web Title: Amravati crime shocking incident in amravati alcohol assault and an explosion of rage husband dies in wifes counter attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • amravati
  • Amravati crime
  • crime

संबंधित बातम्या

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
1

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Health Update: अवयवदानातून मिळते इतरांना नवजीवन! अमरावतीत विविध उपक्रम; गैरसमज दूर करून जागृतीची गरज
2

Health Update: अवयवदानातून मिळते इतरांना नवजीवन! अमरावतीत विविध उपक्रम; गैरसमज दूर करून जागृतीची गरज

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
3

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
4

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.