काय घडलं नेमकं?
अंतकलाबाई आणि अनुसयाबाई या दोन्ही महिला दुपारच्या सुमारास अंदाजे 3 ते 3.30 वाजताच्या दरम्यान आपल्या शेतात कापूस वेचत होत्या. त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला करून दोघींचा गळा दाबून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी सूत्रांनी दिली आहे. घटनास्थळी काही ठिकाणी धक्काबुक्कीचे चिन्हे देखील आढळले. दोघींच्या अंगावरील दागिने किंवा रोख रक्कम गायब असल्याचेही माहिती काही स्थानिकांकडून पुढे आली आहे. हा प्रकार केवळ हत्या नसून लुटमारीचा प्रयत्न असावा असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या घटनेने माहूर तालुका हादरला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आरोपींचा तपास करत असून ही घटना लुटमारीशी संबंधित आहे की कोणत्या वैयक्तिक वैमनस्यातून घडली आहे याचा तपास वेगाने सुरु आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, मित्राच्या रूमवर गेली आणि…; नेमकं प्रकरण काय?
नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आला. शीतल मोरे असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तरुणी ही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. पांगरी परिसरात राहणाऱ्या आपल्या मित्राच्या भाड्याच्या खोलीत अभ्यासासाठी ती जात होती. मात्र त्याच खोलीमध्ये शीतलचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने संशय व्यक्त केला जात आहे. ही आत्महत्या आहे की हत्या असे संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी संतप्त नातेवाईक रात्री पोलीस ठाण्यात जमले होते. विविध संघटनाच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
शीतल मोरे असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती पांगरी परिसरात राहणाऱ्या आपल्या मित्राच्या भाड्याच्या खोलीत अभ्यासासाठी जात होती. मात्र, त्याच खोलीमध्ये शीतलचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर शीतलच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत अनेक नातेवाईक, सामाजिक संघटना आणि महिलांच्या संस्थांनी पोलिसांवर दबाव आणत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर पोलिसांनी मध्यरात्री आरोपी माधव काळे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला व त्याला अटकही केली.
Ans: पाचोन्दा
Ans: अज्ञात
Ans: पोलीस






