crime (फोटो सौजन्य: social media)
नाशिकमध्ये भीषण अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक शहरातील बळी मंदिर चौफुलीवर काल (3 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. यात बळी मंदिरात पारायण जाणाऱ्या राधाबाई गायकवाड या 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेस भरधाव ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात राधाबाई गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक सोडून पलायन केले.
दररोजप्रमाणे त्या परायणाला जात होत्या
या घटनेप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलिसात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रावण महिना सुरु असल्यामुळे बळी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राधाबाई या दररोज जात होत्या. दररोजप्रमाणे त्या काल जात असतांना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर हादरलं! किरकोळ वादातून 30 वर्षीय युवकाची हत्या, मुख्य आरोपी अटक
उल्हासनगरमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. किरकोळ कारणातून ३० वर्षीय युवकाची धारदार शास्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. उल्हासनगरमधील कॅम्प 1 येथील साईबाबा मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीच नाव साजिद शेख असं आहे. याप्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपी फरार आहेत. याप्रकरणी पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
नेमकं काय घडलं?
१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साजिद शेख आणि रोहित पासी यांची भेट झाली होतो. त्यांच्यात झालेल्या वादावर चर्चा करण्यासाठी हे दोघे पुन्हा एकत्र आले होते. मात्र, चर्चा शांतपणे न सुटत वाद वाढला. त्या रात्री सुमारे अडीच वाजता साजिदच्या मित्राने रोहित पासी आणि त्याचा साथीदार प्रवीण उज्जीनवाल यांना अडवला. त्यानंतर साजिदला फोन करून बोलावून घेतलं. साजिद मदतीसाठी घटनास्थळी पोहोचताच,आधीपासूनच दबा धरून बसलेल्या 15 ते 20 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. साजिद गंभीर जखमी झाला होता त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
उल्हासनगर पोलिसांनी आरोपी रोहित पासी आणि त्याचा साथीदार प्रवीण उज्जीनवाल याला अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस करत आहे. साजिदची पत्नी गरोदर आहे. जो पर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत मी साजिदचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा तीव्र आक्रोश तिने व्यक्त केला आहे. पोलिसांनी मुख्य दोन आरोपींना अटक केली आहे आणि उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.