
crime (फोटो सौजन्य: social media)
नाशिक: नाशिकच्या पाथर्डी गावातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. जमिनीतून सोने काढण्याचे आमिष दाखवून एका भोंदूबाबाने महिलेचे लैंगिक शोषण करून सुमारे पन्नास लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनीं भोंदू बाबाला अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय प्रकरण?
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या पतीला दारूचे व्यसन होते. हे दारूचे व्यसन घालवून देतो असे म्हणत संशयित भोंदूबाबा गणेश जगताप हा तिच्या संपर्कात आला. त्यानंतर गणेश हा पीडित महिलेला विविध तांत्रिक पूजाविधींसह वेगवेगळे दावे करत तसेच स्मशानभूमीत विधी करतो, अशा प्रकारच्या गोष्टी
सांगून, तसेच तू मला आवडतेस, असे सांगत त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला.
‘मरायच्या आधी सर्वांच्या मनातून…’; इन्स्टा स्टोरी ठेवत 18 वर्षीय तरुणाने संपवलं जिवन
विविध ठिकाणी अत्याचार
एक पुस्तक दाखवून त्यात फिर्यादी, तिचा पती व मुलांची नावे आहे ती तर शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर नावे असलेल्यांपैकी कोणाचाही बळी जाईल, अशी धमकी दिली. या डंकीच्या आधारे संशियित भोंदूबाबाने विविध ठिकाणी फिर्यादीवर अत्याचार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. याशिवाय बंगला घेऊन देतो, फ्लॅट मिळवून देतो, जमिनीतून सोने दाखून देतो, पैशांचा पाऊस पाडून देतो, अशा एक ना अनेक खोट्या आश्वासन दिले. या खोट्या आश्वासनांनी तिच्या कुटुंबियांकडून सुमारे पन्नास लाख उपाये उकळून घेतले असे तक्रारीत म्हंटले आहे.
फरार भोंदूबाबाचा शोध सुरु
फसवणूक झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयितावर बलात्कार, फसवणूक तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. इंदिरानगर पोलीस संशयित भोंदूबाबा गणेश जगताप याचा शोध घेत आहेत. तो फरार आहे. भोंदूबाबा जगताप पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अनेक पीडित महिलांसह फसवणुकीच्या तक्रारी देण्यासाठी अनेक जण पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या पूर्वीही अटक
भोंदुबाबा गणेश जगताप याने यापूर्वी पाथर्डी गावाजवळील भवानी माथा परिसरात बडेबाबा मच्छिंद्रनाथ ट्रस्ट या नावाची संस्था सुरु केली होती. या ठिकाणी मंदीर देखील बांधले होते. याच मंदिरात येणाऱ्या भाविकांची फसवणूक केल्याच्या या पूर्वी देखील इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावेळी देखील त्याला अटक करण्यात आली होती.
Ans: जगताप
Ans: 50 लाख
Ans: इंदिरानगर