crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा एका युवकावर धारदार शस्त्राने थरारक हल्ला करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना पंचवटीतील गजानन चौक परिसरातील कोमटी गल्लीत सोमवारी (दि. 13 ऑक्टोबर) दुपारी घडली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, एक युवक पळत-पळत गजानन चौकातील कोमटी गल्लीत आला. काही क्षणांतच दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी त्याचा पाठलाग केला. या दरम्यान त्यांनी दोन मुलींना आणि शाळेच्या व्हॅनला धडक दिली आणि त्यानंतर त्या युवकाला रस्त्यातच गाठले.
यानंतर, दुचाकीवरून उतरलेल्या एकाने धारदार शस्त्राने तरुणाच्या पोटावर वार केला. मात्र, परिसरातील काही नागरिकांनी आरडाओरडा करत हस्तक्षेप केल्याने हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. सुदैवाने युवकाला गंभीर दुखापत झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हल्ल्याचा थरार CCTV मध्ये कैद
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून काही नागरिकांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डही केले आहेत. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेऊन हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे.घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र दोघेही आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेमुळे कोमटी गल्ली परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांसाठी मोठं आव्हान
दरम्यान, नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालय विशेष मोहीम राबवत आहे. अनेक राजकीय आणि सामाजिक गुन्हेगारांवर कारवाई सुरू असतानाच झालेली ही घटना पोलिसांसाठी एक मोठं आव्हान ठरत आहे.
मुख्य मुद्दे
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक
नाशिक मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सायबर ठगांनी डिजिटल अरेस्टच्या माद्यमातून दोन ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याचे समोर आले आहे. यात एका ज्येष्ठ नागरिकाला ६ कोटींनी लुटण्यात आला तर दुसऱ्याला ७२ लाखांचा चुना लावल्याचं समोर आलं आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि अश्लील
फोटो व्हायरल झाल्याचं सांगत डिजिटल अरेस्ट केलं आणि हे पैसे उकळले.
Bihar Crime: बिहार हादरलं! एएसआय ने गोळ्या झाडून केली आत्महत्या; कौटुंबिक वादामुळे घेतला निर्णय?