कोयत्याचे वार, भररस्त्यात खून
नाशिक मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका हॉटेलमध्ये मद्यपींच्या चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून दोन भावांना मारहाण करण्यात आली. मारहाणीत एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. राम बोराडे (२०) असं मृतकाचे नाव आहे तर राजेश बोराडे हा गंभीर जखमी आहे. या प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिमुरडी घरासमोर खेळत असताना…,नराधमाने बलात्कारानंतर केली निर्घृण हत्या
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये बसलेल्या चार ते पाच मद्यपींकडून रागाने का बघतो असे म्हणत वाद घालण्यात आला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. टोळक्याने कोयत्याने वार करून राम बोराडे आणि त्याचा चुलत भाऊ राजेश बोराडे या दोघांवर सपासप वार केले. या हल्ल्यामध्ये राम बोराडे याचा जागीच मृत्यू झाला असून राजेश बोराडे हा गंभीर जखमी झाला आहेत.त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर टोळक्याने परिसरातील चारचाकी वाहनांची देखील तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
नराधमाने बलात्कारानंतर केली निर्घृण हत्या
आता कुठे तिच्या आयुष्याची सुरवात होत होती तर एका नराधमाने चिमुरडीवर बलात्कार करून निर्दयतेने हत्या केली. ही संतापजनक घटना कर्नाटकच्या हुबळीमध्ये घडली आहे. आरोपी बिहारी मजूर होता. आरोपीचं नाव रितेश कुमार होत. ३५ वर्षाचा रितेश कुमार बिहारचा राहणारा होता. त्याने त्या चिमुरडीवर आधी बलात्कार केला आणि नंतर निर्घृण पणे हत्या करून पसार झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याचे ओळख पटण्यासाठी त्याला त्याच्या घरी नेले असता त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि पोलिसांच्या तावडीतून निसटून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर पॉक्सो कायद्यातंर्गत हत्या, पोलिसांवर हल्ला आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.