SMALL GIRL (फोटो सौजन्य - PINTEREST)
आता कुठे तिच्या आयुष्याची सुरवात होत होती तर एका नराधमाने चिमुरडीवर बलात्कार करून निर्दयतेने हत्या केली. ही संतापजनक घटना कर्नाटकच्या हुबळीमध्ये घडली आहे. आरोपी बिहारी मजूर होता. आरोपीचं नाव रितेश कुमार होत. ३५ वर्षाचा रितेश कुमार बिहारचा राहणारा होता. त्याने त्या चिमुरडीवर आधी बलात्कार केला आणि नंतर निर्घृण पणे हत्या करून पसार झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याचे ओळख पटण्यासाठी त्याला त्याच्या घरी नेले असता त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि पोलिसांच्या तावडीतून निसटून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर पॉक्सो कायद्यातंर्गत हत्या, पोलिसांवर हल्ला आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Salman Khan: ‘कारही बॉम्बने उडवून देणार…’, सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
नेमकं काय घडलं?
चिमुरडी तिच्या घरासमोर खेळत असताना रितेश कुमारची वाईट नजर तिच्यावर पडली. त्याने आपला मनातला घाणेरडा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी मुलीला पकडलं आणि तिला शेडमध्ये घेऊन गेला. मुलगी रडत होती, आरडा-ओरडा करत होती. मुलीच्या ओरडण्याच्या आवाज ऐकून लोक तिथे पोहोचले. पण तो पर्यंत आरोपी रितेशने, मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. लोक पोहोचेपर्यंत रितेश तिथून पळून गेलेला. मुलगी घरासमोर खेळत असताना रितेश तिला पकडून शेडमध्ये घेऊन गेला. हे सगळ तिथल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची ओळख पटवण्यासाठी आणि त्याची कागदपत्र घेण्यासाठी त्याला त्याच्या घरी नेलं असता आरोपीने पोलिसांवर दगडफेक केली व पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. पोलीस आयुक्त शशी कुमार म्हणाले की, आरोपीने त्याची ओळख पटू नये यासाठी तो सर्व कागदपत्र देत नव्हता व ओळख लपवण्याचा प्रयत्न केला.
एन्काऊंटरमध्ये मृत्यू
आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमच्या महिला अधिकारी, सब-इंस्पेक्टर, अन्नपूर्णाने आरोपीला इशारा देण्यासाठी हवेत गोळीबार केला. पण त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर दोन-तीन राऊंड फायर केले. यात एक गोळी त्याच्या पायात, दुसरी पाठीत लागली. आरोपीला लगेच रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आरोपीने पोलिसांवर दगडफेक केली. त्यात सब-इंस्पेक्टर आणि दोन पोलीस जखमी झाले.
गुन्हा दाखल
ही संतापजनक घटना कर्नाटकच्या हुबळीमध्ये घडली आहे. आरोपी बिहारी मजूर होता. आरोपीच नाव रितेश कुमार होतं. 35 वर्षाचा रितेश कुमार बिहारचा राहणारा होता.आरोपी रितेश विरोधात पॉक्सो कायद्यातंर्गत हत्या, पोलिसांवर हल्ला आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.