
crime (फोटो सौजन्य: social media)
नाशिक: नाशिकच्या मालेगावमधून पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात फक्त तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच संपूर्ण गाव तसेच परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
काय घडलं नेमकं?
प्राथमिक माहितीनुसार, गावातीलच एक २४ वर्षीय युवक, विजय संजय खैरनर, याने या निष्पाप चिमुकलीवर प्रथम लैंगिक अत्याचार केला. या अमानुष कृत्यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने चिमुरडीचे डोके दगडाने ठेचून तिची क्रूरपणे हत्या केली. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून हा गुन्हा किती भयानक आणि अमानुष होता याची कल्पना येते. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात भीती पसरली असून लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
आरोपी अटकेत
घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात आरोपीविरुद्ध गंभीर पुरावे आढळल्याने पोलिसांनी संशयित आरोपी विजय खैरनार याला ताबडतोब अटक केली. तर चिमुरडीचा मृतदेह पोस्मॉर्टेमसाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे जप्त केले असून आरोपीवर कठोर शिक्षा होण्यासाठी सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
कठोरात कठोर शिक्षा
या संतापजनक घटनेमुळे डोंगराळे गावातील नागरिक संतप्त झाले असून आरोपीला शक्य तितकी कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अनेक नागरिकांनी पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीवर त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. या घटनेने केवळ गावच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरला असून अशा अमानुष कृत्यांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
तपास सुरु
पोलीस या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने तपासणी करत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार असून पुढील तपासाच्या अनुषंगाने कठोर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. तीन वर्षांच्या निरपराध चिमुकलीवर झालेल्या या अमानुष अत्याचार आणि हत्येमुळे समाजमन अस्वस्थ झाले असून न्याय मिळाल्याशिवाय संताप शांत होणार नाही, असे नागरिक स्पष्टपणे सांगत आहेत.
Ans: नाशिक
Ans: तीन
Ans: पोलीस