Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: अशोक खरात प्रकरणात पत्नीच्याही अडचणी वाढल्या, अटकपूर्व जामीन फेटाळला; पोलीस कोठडीची शक्यता

अशोक खरात प्रकरणात त्यांच्या पत्नी कल्पना खरात यांच्या अडचणी वाढल्या आहेत. फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणात दाखल गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. आता त्यांच्या पोलीस कोठडीतील चौकशीची शक्यता व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 16, 2026 | 03:35 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कल्पना खरात यांच्याविरोधात फसवणूक आणि अवैध सावकारीचा गुन्हा दाखल
  • न्यायालयाने गंभीर पुरावे पाहत अटकपूर्व जामीन फेटाळला
  • कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांप्रकरणी पोलीस तपास वेगात
 

नाशिक: राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता त्यांच्या पत्नी कल्पना खरात यांच्या अडचणी वाढल्या आहेत. फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणात त्यांच्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस त्या नाशिक आणि शिर्डी पोलिसांच्या हाती लागल्या नव्हत्या. अटक टाळण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, तपासातील गंभीर पुरावे लक्षात घेत न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता त्यांची पोलीस कोठडीत चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना खरात यांनी काही व्यक्तींना कोट्यवधी रुपये व्याजाने दिले होते. संबंधित व्यक्तींनी पैसे परत करण्यासाठी आपली जमीन त्यांच्या नावावर करून दिल्याचा आरोप आहे. मात्र, मूळ रक्कम आणि व्याजाची परतफेड करूनही जमीन परत देण्यास नकार देण्यात आल्याची तक्रार फिर्यादीने केली आहे. तब्बल तीन कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा आरोप असून, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

हनिमूनला पतीची हत्या; जामीन मिळताच सोनम रघुवंशीने तोडले मौन, म्हणाली, नेपाळला…

‘माझा संबंध नाही’ म्हणत न्यायालयात दावा

या प्रकरणात “मी केवळ अशोक खरात यांची पत्नी असल्याने मला गोवण्यात आले,” असा दावा कल्पना खरात यांनी न्यायालयात केला. मात्र, सरकारी पक्षाने हा युक्तिवाद खोडून काढत फिर्यादीच्या खरेदीखतावर कल्पना खरात यांची सही असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवत संबंधित व्यवहार झाला नसल्याचा भास निर्माण करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटले.

पोलीस कोठडीची शक्यता

या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याने आणि तपासासाठी सखोल चौकशी आवश्यक असल्याने आरोपीची पोलीस कोठडी गरजेची असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यानंतर न्यायालयाने कल्पना खरात यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. या निर्णयामुळे आता या प्रकरणातील तपास आणखी वेगाने होण्याची शक्यता आहे.

सासवड येथे वकिलाची केली गेली फसवणूक; भागीदारीत जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरु करून…

💡

Frequently Asked Questions

  • Que: कल्पना खरात यांच्यावर कोणते आरोप आहेत?

    Ans: फसवणूक आणि अवैध सावकारीचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.

  • Que: न्यायालयाने कोणता निर्णय दिला?

    Ans: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

  • Que: या प्रकरणात फिर्यादीने काय आरोप केले?

    Ans: व्याजाचे पैसे परत करूनही जमीन परत देण्यास नकार दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

Web Title: Nashik news wifes troubles mount in the ashok kharat case anticipatory bail rejected police custody likely

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
2

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Nashik Cyber Crime: थायलंडच्या नंबरवरून जिल्हाधिकाऱ्यांचा ‘फेक’ अकाउंट; ‘Hello… How are you?’ मेसेज अन्…
3

Nashik Cyber Crime: थायलंडच्या नंबरवरून जिल्हाधिकाऱ्यांचा ‘फेक’ अकाउंट; ‘Hello… How are you?’ मेसेज अन्…

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
4

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.