Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Young India Marathon : दमट हवामान, चढ-उताराचा रस्ता; तरीही लवप्रित, रविनाची विजयी भरारी

Young India Marathon : ठाण्यातील यंग इंडिया राज्यस्तरीय मॅरेथॉनमध्ये पुण्याचा लवप्रित सिंग आणि नाशिकची रविना गायकवाड विजेते ठरले. दोघांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. स्पर्धेत साडेतीन हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 01, 2026 | 09:53 PM
Young India Marathon : दमट हवामान, चढ-उताराचा रस्ता; तरीही लवप्रित, रविनाची विजयी भरारी

Young India Marathon : दमट हवामान, चढ-उताराचा रस्ता; तरीही लवप्रित, रविनाची विजयी भरारी

Follow Us
Follow Us:
  • पुरुष गटात लवप्रितची बाजी
  • महिला गटात रविना अव्वल
  • 10 किलोमीटर गटात स्वराज एसची बाजी
 

ॲथलिड्सतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सहकार्याने आयोजित यंग इंडिया राज्यस्तरीय मॅरेथॉन (Young India Marathon)स्पर्धेत पुरुष गटात पुण्याचा लवप्रित सिंग, तर महिला गटात नाशिकची रविना गायकवाड यांनी विजेतेपद पटकावले. दोघांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि गौरवपदक देऊन सन्मानित करण्यात आले.

ॲथलिड्सच्या या दुसऱ्या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध 11 गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत साडेतीन हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. पहाटेच्या वेळीही असलेले दमट हवामान, चढ-उतार आणि वळणाचे रस्ते यामुळे धावपटूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रतिकूल परिस्थितीतही आघाडीच्या धावपटूंमध्ये अवघ्या काही सेकंदांची चुरस पाहायला मिळाली.

पुरुष गटात लवप्रितची बाजी

पुरुषांच्या 21 किलोमीटर शर्यतीत लवप्रित सिंगने 1 तास 6 मिनिटे 38 सेकंदांत अंतर पूर्ण करत पहिले स्थान मिळवले. राज तिवारीने 1 तास 7 मिनिटे 16 सेकंदांत शर्यत पूर्ण करत दुसरा क्रमांक मिळवला. दिनकर महालेने 1 तास 8 मिनिटे 40 सेकंदांची वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले.

IND vs NZ: किंग कोहली पुन्हा मैदान गाजवणार! Virat Kohli भेदणार सचिन तेंडुलकरचा किल्ला? न्यूझीलंडविरुद्ध डबल रेकॉर्डची संधी

महिला गटात रविना अव्वल

महिला गटात राष्ट्रीय धावपटू रविना गायकवाड आणि अमृता पटेल यांच्यात शेवटपर्यंत चुरस रंगली. रविनाने 1 तास 29 मिनिटे 25 सेकंदांत 21 किलोमीटरचे अंतर पूर्ण करत विजेतेपद मिळवले. अमृता पटेलने 1 तास 29 मिनिटे 38 सेकंदांची वेळ नोंदवत दुसरे स्थान मिळवले. तेजस्विनी लंबकर्णेने 1 तास 30 मिनिटे 15 सेकंदांत शर्यत पूर्ण करत तिसरा क्रमांक पटकावला.

Hong Kong Sixes : ऑस्ट्रेलियाला नमवत अफगाणिस्तानने जिंकला जेतेपदाचा मान, इमरानची धुवांधार खेळी

10 किलोमीटर गटातील विजेते

पुरुषांच्या राज्यस्तरीय 10 किलोमीटर गटात स्वराज एसने 30 मिनिटे 42.7 सेकंदांची वेळ नोंदवत पहिले स्थान मिळवले. अनिल जाधव (31:08.9) दुसरा, तर अजय पाल (31:08.18) तिसरा ठरला.

महिला 10 किलोमीटर गटात साक्षी पवारने 38:45.05 वेळेसह प्रथम क्रमांक मिळवला. प्रियांका ओक्सा (40:30.05) दुसरी, तर कोमल खांडेकर (41:24.9) तिसरी ठरली.

19 वर्षांखालील गटाचा निकाल

मुलांच्या 19 वर्षांखालील 10 किलोमीटर गटात गोविंद पाडेकर (31:39.09) प्रथम, तेजस सपकाळे (32:49.02) द्वितीय, तर जय बोऱ्हाडे (33:10.08) तृतीय ठरला.

मुलींच्या गटात खुशी सिंगने 39:39.09 वेळेसह पहिले स्थान मिळवले. अंजली पंडित (41:41.05) दुसरी, तर वर्षा पाटील (45:01.04) तिसरी ठरली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: यंग इंडिया मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात कोण विजेता ठरला?

    Ans: पुण्याचा लवप्रित सिंग पुरुषांच्या 21 किलोमीटर गटात विजेता ठरला.

  • Que: महिला गटात विजेतेपद कोणी पटकावले?

    Ans: नाशिकच्या रविना गायकवाडने महिला 21 किलोमीटर गटात विजेतेपद मिळवले.

  • Que: 21 किलोमीटर शर्यतीत पुरुष गटात दुसरा आणि तिसरा क्रमांक कोणाचा होता?

    Ans: राज तिवारीने दुसरा, तर दिनकर महालेने तिसरा क्रमांक मिळवला.

Web Title: Young india marathon lovepreet singh ravina gaikwad winners rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 09:53 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Marathon
  • Nashik

संबंधित बातम्या

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना त्रास दिला तर आडवं करू!’ मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
1

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना त्रास दिला तर आडवं करू!’ मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा थेट इशारा

पाचशे कोटींची ‘ती’ ऑडिओ क्लिप ठरतेय चर्चेचा विषय; तपासाकडे लागले सर्वांचे लक्ष
2

पाचशे कोटींची ‘ती’ ऑडिओ क्लिप ठरतेय चर्चेचा विषय; तपासाकडे लागले सर्वांचे लक्ष

Maharashtra Politics : महायुतीत नेमकं चाललंय काय? धंगेकर – बन यांच्यात सोशल मीडिया वॉर, एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला
3

Maharashtra Politics : महायुतीत नेमकं चाललंय काय? धंगेकर – बन यांच्यात सोशल मीडिया वॉर, एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला

Nashik Kumbh Mela: नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व काय? महंत नरसिंह कृपादास यांनी सांगितले गोदावरी सेवेचे महत्त्व
4

Nashik Kumbh Mela: नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व काय? महंत नरसिंह कृपादास यांनी सांगितले गोदावरी सेवेचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.