
crime (फोटो सौजन्य: social media)
कशी झाली फसवणूक ?
फसवणूक झालेल्या ८० वर्षीय वृद्धाचे नावे सुरेंद्रकुमार शर्मा असे आहे. ते खारघर, नवी मुंबई येथे वास्तव्यास आहेत. ते निवृत्त असून शांत आयुष्य जगत होते. मात्र २१ नोव्हेंबर २०२५ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीत अनोळखी सायबर गुन्हेगारांनी त्यांना जाळ्यात ओढले. अनोळखी आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला फोन कॉल्स, व्हॉट्सॲप आणि इतर ऑनलाइन माध्यमांतून संपर्क साधला. त्यांनी स्वतःला शासकीय यंत्रणेशी संबंधित असल्याचे भासवले. विशेष म्हणजे आरोपींनी संदीप राव, प्रदीप जैसवाल आणि विश्वास नांगरे पाटील यांसारख्या ओळखीच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचा वापर करून फिर्यादीवर विश्वास बसवण्याचा प्रयत्न केला.
आरोपींनी बनावट शासकीय नोटीसा, पत्रे आणि कागदपत्रे पाठवून फिर्यादीला एखाद्या गंभीर गुन्ह्यात अडकवण्यात आले असल्याचा आभास निर्माण केला. “तुमच्यावर गुन्हा दाखल असून तातडीने अटक होऊ शकते,” अशी धमकी देत त्यांनी वृद्धाला घाबरवले. या मानसिक दबावामुळे आणि समाजात बदनामी होण्याच्या भीतीपोटी फिर्यादीने आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये ४,३८,६२,२१० कोटी पैसे वर्ग केले.ही रक्कम त्यांच्या आयुष्यभराच्या बचतीची असल्याने वृद्ध नागरिकाला मानसिक धक्का बसला आहे.
या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची सायबर पोलिसांनी बी.एन.एस (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आहे. मात्र आरोपींनी वापरलेले मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, व्यवहारांची साखळी (money trail) आणि डिजिटल पुरावे तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वेगवेगळ्या राज्यांतील बँक खात्यांचा वापर झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सायबर पोलिसांचे आवाहन
सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणताही शासकीय अधिकारी फोन किंवा ऑनलाइन माध्यमातून पैसे मागत नाही, तसेच अटकेची पूर्वसूचना देत नाही, हे नागरिकांनी लक्षात ठेवावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Ans: नवी मुंबईतील खारघर परिसरात.
Ans: तब्बल 4 कोटी 38 लाख 62 हजार 210 रुपये.
Ans: शासकीय अधिकारी असल्याचे भासवून, अटकेची भीती दाखवून व बनावट नोटीसा पाठवून.