UP Crime: प्रेमविवाहाचा भयंकर शेवट; चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या
कशी उघडकीस आली घटना?
दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी हा मृतदेह कोणाचा याचा तपास केला असता हा मृतदेह रामूचा असल्याचे समोर आले. रामूचा मृत्यू सुरुवातीला रस्ता अपघातात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला होता. मात्र तपास केला असता हा अपघात नाही तर हत्या असल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर ही हत्या त्याच्याच पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
काय घडलं नेमकं?
रामू आणि पप्पी यांचा विवाह अवघ्या आठ महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र पप्पी या लग्नावर समाधानी नव्हती. लग्नानंतर ती आपल्या प्रियकर मोहम्मद तफजीलशी संबंध ठेवून होती. यावरून पती आणि पत्नीमध्ये खटके उडू लागले. १४ जानेवारीला रामू आपल्या सासरी खिचडी कार्यक्रमासाठी गेला होता. रात्री तिथे मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परतताना पप्पीने तब्येत बरी नसल्याचे सांगत डॉक्टरकडे घेऊन जाण्याची विनंती केली.
रामू पप्पीला घेऊन तिच्या प्रियकर असलेल्या डॉक्टरकडे गेला. तिथेच आधीपासूनच रामूच्या हत्येचा कट आखण्यात आला होता. परत येताना खैराबाद टोल प्लाझाजवळ कुंवरपूर परिसरात मोहम्मद तफजील आणि त्याचा साथीदार आनंद कुमार यांनी रामूला अडवले. काही कळायच्या आत तिघांनी मिळून लोखंडी रॉडने रामूवर जबरदस्त हल्ला केला. रामू खाली कोसळल्यानंतर त्याचा मफलरने गळा आवळून हत्या करण्यात आली. पप्पीने स्वतः मफलरने गळा दाबून तो मृत होईपर्यंत पकडून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
हत्या केल्यानंतर पप्पीनेच लोकांना आणि पोलिसांना फोन करून पतीचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र पोलिसांना चौधरी यांना या प्रकरणात संशय वाटू लागला आहे. पप्पीची कसून चौकशी केल्यांनतर तिचे पितळ उघड झाले आणि तिने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी हत्या करण्यासाठी वापरलेली लोखंडी रॉड, मफलर आणि शाल जप्त केली आहे. पोलिसांनी पप्पी, तिचा प्रियकर मोहम्मद तफजील उर्फ मीनू चौधरी आणि त्याचा साथीदार आनंद कुमार यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील कारवाई करत असून पुढील तपास करत आहे.
Ans: पोलिस तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाले.
Ans: पत्नी पप्पीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पती रामूची हत्या केली.
Ans: लोखंडी रॉडने मारहाण करून मफलरने गळा आवळण्यात आला.






